Flipkart ची ‘ही’ सेवा येतीये ग्राहकांच्या मदतीला; पुढील 6 महिन्यांतच…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आपण अनेकदा ई-कॉमर्स साईट Flipkart चा वापर केला असेल. त्याच्या ग्राहकांची संख्याही मोठी आहे. पण आता Flipkart पुढील 6 महिन्यांत मोठ्या प्रमाणात विस्तारणार आहे. त्यानुसार कंपनीकडून 70 पेक्षा जास्त शहरांत किराणा सेवांचा विस्तार करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. याबाबतची माहिती कंपनीने आज (मंगळवार) दिली.

वॉलमार्टच्या मालकीची कंपनी देशभरात ई-ग्रोसरी सेगमेंटमध्ये नाव कमावत आहे. Flipkart ची अ‍ॅमेझॉन आणि रिलायन्समध्ये पहिल्यापासूनच डिजिटल कॉमर्स स्पेसमध्ये स्पर्धा आहे. त्यानंतर आता किराणा सेवांमध्ये आपला विस्तार करण्याचा विचार करत आहे. कंपनीने कोलकाता, अहमदाबाद आणि वेल्लोरसह 50 पेक्षा जास्त शहरांमध्ये विस्तार करणार आहे.

याबाबत Flipkart ने सांगितले, की या विस्तारामध्ये 7 मोठी शहरे आणि 40 पेक्षा जास्त शेजारील शहरांत युजर्सला उच्च गुणवत्तेचा किराणा उत्पादन, ऑफर आणि तातडीने डिलिव्हरीसह किराणा खरेदीचा सोपा पर्याय उपलब्ध करून देत आहे. कोरोना व्हायरसनंतर ई-कॉमर्सच्या माध्यमातून लाखो लोक किराणा सामान खरेदी करत आहेत. यात फक्त शहरात नाहीतर इतर ठिकाणचे लोकही खरेदी करत आहेत.

गेल्या वर्षी व्यवसायात वाढ

फ्लिपकार्टने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले, की किराणा सेवांमधून तेजीने विस्तारण्यासाठी गुंतवणूक केली जात आहे. गेल्या वर्षानंतर कंपनीकडून मोठ्या प्रमाणात तेजीने काम केले जात आहे. यामध्ये यशस्वीही झाले आहे.

राजकोट, तिरुपतीसह इतर ठिकाणी सुरुवात

फ्लिपकार्टने सेवांचा विस्तार मेट्रो शहरांशिवाय म्हैसूर, कानपूर, वारंगल, प्रयागराज, अलिगड, जयपूर, चंदीगड, राजकोट, वडोदरा, वेल्लोर, तिरूपती आणि दमन यांसारख्या शहरातही सुरुवात केली आहे.