खुशखबर ! दिवाळीपुर्वीच मिळतंय स्वस्त ‘सोनं’, ‘इन्मक टॅक्स’मध्ये सुट आणि ‘या’ सुविधा देखील, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – धनत्रयोदशी आणि दिवाळीआधीच सरकारने स्वस्त दरात सोने खरेदीची संधी दिली आहे. गुंतवणूकदार सॉवरेल गोल्ड बॉन्ड योजनेंतर्गत स्वस्त सोने खरेदी करु शकतात. या योजनेचा लाभ 21 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या दरम्यान घेता येईल. यात तुम्हाला आयकर नियमांतून सूट देखील मिळेल. आरबीआय हे बॉन्ड सरकारच्या वतीने 30 ऑक्टोबरला जारी करेल.

3,835 रुपये प्रति ग्रॅम सोने –

या योजनेंतर्गत ग्राहक 3,835 रुपये प्रति ग्रॅम सोने खरेदी करु शकतात. गुंतवणूकदार यासाठी ऑनलाइन अर्ज करु शकतात आणि ऑनलाइन पेमेंट देखील करु शकतात. यामध्ये प्रति ग्रॅमवर 50 रुपयांपर्यंत सूट मिळेल. यात ग्राहक कमीत कमी 1 ग्रॅम सोने गुंतवू शकतो. आरबीआयच्या मते गोल्ड बाॅन्डचे सब्सक्रिप्शन पुन्हा एकदा डिसेंबर महिन्यात 2 – 6 डिसेंबर आणि जानेवारी मध्ये 13 – 17 तारखेला तर फेब्रुवारीमध्ये 3 – 7 तारखेला तर मार्च महिन्यात 2 – 6 तारखेला सुरु होईल.

कशी मिळेल आयकरात सूट –

गोल्ड बॉन्ड मॅच्युरिटी पीरियड 8 वर्षांचा असतो याशिवाय यावर वर्षाला 2.5 टक्के व्याज मिळते. यावर मिळणारे व्याज गुंतवणूकदार टॅक्स स्लॅबच्या स्वरुपात कर योग्य करु शकतो, परंतू या स्त्रोतावर कपातीनंतर टीडीएस मिळत नाही. गुंतवणूकदाराला हे माहिती हवे की जर बॉन्ड तीन वर्षानंतर किंवा 8 वर्षाच्या आत विकले तर त्यावर 20 टक्क्याने लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आकारण्यात येईल. परंतू मॅच्युरिटीनंतर विकल्यास ते व्याज करमुक्त असेल. कोणताही व्यक्ती एका आर्थिक वर्षात किमान एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त 500 ग्रॅमपर्यंत गुंतवणूक करु शकतात. सॉवरेन गोल्ड बाॅन्डची सुरुवात नोव्हेंबर 2015 पासून होईल. या योजनेचे लक्ष फिजिकल गोल्डची मागणी कमी करणे आहे.

सॉवरेन गोल्ड बॉन्ड –

या योजनेत गुंतवणूकदार सोन्यात पैसे गुंतवतो परंतू यासाठी त्यांना फिजिकल फॉर्म मध्ये सोने ठेवण्याची गरज नाही. योजनेत गुंतवणूकीत प्रति युनिट गोल्डमध्ये गुंतवणूकीची संधी मिळते, ज्याची किंमत बुलियनच्या बाजार मूल्यशी जोडलेली असेल.

Visit  :Policenama.com