खुशखबर ! सुस्तावलेल्या मागणीमुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने बाजारात सोमवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे पहायला मिळाले. दिवस संपत असताना सोने २०० रुपयांनी स्वस्त झाले. एका मीडिया रिपोर्ट नुसार बाजार संपत असताना ३२,६२० रुपये प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर होता. ऑल इंडिया सराफ एसोसिएशन यांच्या म्हणण्यानुसार जागतिक संकेतानुसार सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याचे भाव उतरल्याचे सांगण्यात येत आहे.

याबरोबरच चांदीच्या दारात देखील काल घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. चांदी ८० रुपयांनी स्वस्त होऊन ३८,१०० रुपयांवर येऊन पोहचली. मागणी कमी झाल्यामुळे सोने चांदीच्या दारात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

दुसरीकडे आंतराष्ट्रीय स्तरावर विचार करता न्यूयार्क मध्ये देखील सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. सोने १,२८७. १० डॉलर प्रति औंस झाल्याचे पाहायला मिळाले तर चांदीचा दर १५. ०१ डॉलर प्रति औंस वर येऊन पोहचला आहे. (अडीच तोळे म्हणजे १ औंस) शनिवारी देखील सोन्याच्या दरात ३० रुपयांनी घट होत दर ३२,८२० रुपये प्रति तोळा इतका झाला होता. गेल्या तीन सत्रात सोन्याच्या किंमतीत २५० रुपयांची घसरण झाली आहे.

दरम्यान, मुंबईत आजचा सोन्याचा दर ३२,६८० प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर पुण्यात आजचा सोन्याचा दर ३२,१०० प्रति १० ग्राम साठी आहे. गेल्या १० दिवसांचा विचार करता सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

केवळ दागिने म्हणून नाही तर गुंतवणूक म्हणून देखील सोन्याचा पर्याय निवडला जातो. दरम्यान, दसरा दिवाळी पासून सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत होती. मात्र, त्यानंतर आता सोन्याच्या दरात घाट झाली आहे. ऐन लग्नासराईत सोन्याचा दर कमी होणे ही सर्वसामान्यांसाठी आनंदवार्ता आहे.

You might also like