खुशखबर ! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्यवहार कमी झाल्याने तसेच सट्टेबाजांनी नफा बुकिंग केल्यामुळे शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात घट झाली. सराफ बाजारात सोन्याची किंमत 65 रुपयांनी कमी होऊन सोने 37,925 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तसेच चांदीच्या किंमतीतही 233 रुपयांनी घट होऊन चांदीचे दर 45,406 रुपये प्रति किलोग्रॅम झाले.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजच्या विश्लेषकांच्या मते, मुख्यत: देशांतर्गत बाजारात सहभागी झालेल्या नफा बुकिंगमुळे सोन्याच्या किंमती घसरल्या. सट्टेबाज सौदे आणि सध्याच्या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मौल्यवान धातूंच्या किंमती कमी झाल्या.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही (न्यूयॉर्क) सोन्याच्या किंमती 0.01 टक्क्यांनी घसरून 1,513.70 डॉलर प्रति औंसवर आल्या. तर दुसरीकडे चांदीचे दरही खाली आले. एक औंस चांदीची किंमत 0.26 टक्क्यांनी घसरून 17.63 डॉलरवर आली.

यापूर्वी काल सोन्याच्या किमतींमध्ये वाढ तर चांदीच्या किमतीत घट झाली होती. आभूषण निर्मात्यांकडून शुद्ध सोन्याची मागणी कमी झाल्याने सराफ बाजारात सोन्याच्या किंमती 200 रुपयांनी कमी होऊन 38,270 रुपये प्रति 10 ग्रॅम झाल्या होत्या तर चांदीच्या किंमतीत 1300 रुपयांनी वाढ होऊन चांदीचे दर 46,500 रुपये प्रति किलोग्रॅम झाले होते.

visit : Policenama.com