Gold Futures Price : प्रचंड वाढीसह ‘उच्चांकी’च्या जवळ पोहचले सोन्याचे दर, चांदीमध्ये देखील जबरदस्त ‘तेजी’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   शुक्रवारी वायदा बाजारात सोन्याच्या किंमती वाढताना दिसत आहेत. शुक्रवारी दुपारी एमसीएक्स एक्सचेंजवर, 5 जून 2020 चे सोन्याची वायदा किंमत 249 रुपयांनी वाढून 46,948 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत होती. या सोन्याची सर्वोच्च पातळी प्रति 10 ग्रॅम 47,327 रुपये आहे. तसेच एमसीएक्सवर 5 ऑगस्ट 2020 चा सोन्याचा वायदा भाव शुक्रवारी दुपारी 283 रुपयांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅम 47,130 रुपयांवर होता. या सोन्याची सर्वोच्च पातळी प्रति 10 ग्रॅम 47,491 रुपये आहे.

शुक्रवारी वायदा बाजारात चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली. शुक्रवारी दुपारी एमसीएक्सवर 3 जुलै 2020 चा चांदीचा वायदाचा भाव 1,348 रुपयांच्या जबरदस्त वाढीसह 45,483 रुपये प्रतिकिलोवर ट्रेंड करत होता.

आंतरराष्ट्रीय स्तराविषयी बोलायचे झाल्यास शुक्रवारी दुपारी सोन्याचे वायदा आणि स्पॉट किंमती या दोन्ही बाबींमध्ये वाढ झाली आहे. ब्लूमबर्गच्या मते शुक्रवारी दुपारी सोन्याचा जागतिक वायदा भाव कॉमेक्सवर 0.20 टक्क्यांनी म्हणजेच 3.50 डॉलरच्या वाढीसह 1744.40 डॉलर प्रति औंस होता. त्याचबरोबर सोन्याची जागतिक पातळीवरील किंमत 0.36 टक्के म्हणजेच 06.18 डॉलरच्या वाढीसह 1,736.48 डॉलर प्रति औंसवर पोहोचली. तसेच आंतरराष्ट्रीय चांदीच्या दरातही तेजी दिसून आली. ब्लूमबर्गच्या मते शुक्रवारी दुपारी चांदीची जागतिक किंमत 2.46 टक्क्यांनी म्हणजेच 0.39 डॉलरच्या वाढीसह 16.26 डॉलर प्रति औंस होता. याशिवाय, शुक्रवारी दुपारी चांदीचा जागतिक वायदा भाव कोमेक्सवर 2.66 टक्के म्हणजेच 0.43 डॉलरसोबत 16.60 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता.