Gold Futures Price : प्रचंड वाढीसह सोनं उच्चांकीवर, चांदीमध्ये देखील जबरदस्त तेजी, जाणून घ्या दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊन जसे वाढत आहे तसतसे सोन्याचे भावही वाढत आहेत. त्यामुळेच देशांतर्गत वायदा बाजारात सोमवारी सोने उच्च स्तरावर ट्रेंड करत होते. सोमवारी सकाळी एमसीएक्स एक्सचेंजवर ५ जून २०२० सोन्याचा वायदा भाव ३८९ रुपयांनी वाढून ४७,७७० रुपये प्रति १० ग्रॅमवर ट्रेंड करत होता. त्याशिवाय एमसीएक्सवर ५ ऑगस्ट २०२० सोन्याचा वायदा भावही सोमवारी सकाळी सर्वांत उच्च स्तरावर ट्रेंड करत होता. हे ३९१ रुपयांच्या वाढीसह प्रति १० ग्रॅम ४७,९६० रुपयांवर ट्रेंड करत होते. जागतिक किमतींत वाढ आणि लॉकडाऊन पुढे वाढल्यामुळे सोन्याच्या देशांतर्गत वायदा किमतींत वाढ दिसून येत आहे.

दुसरीकडे चांदीच्या किंमतीत सोमवारी प्रचंड वाढ झाली आहे. एमसीक्सवर सोमवारी सकाळी ३ जुलै २०२० चांदीचा वायदा भाव २.७९ टक्के म्हणजे १,३०२ रुपयांच्या वाढीसह ४८,०२० रुपये प्रति किलोग्रामवर ट्रेंड करत होता. जागतिक बाजारपेठेतही सोमवारी सकाळी सोन्याच्या वायदा आणि हाजीर किंमतींत लक्षणीय वाढ झाली आहे. ब्लूमबर्गनुसार, सोमवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याचा जागतिक वायदा भाव ०.७१ टक्क्यांनी किंवा १२.५० डॉलरने वाढत १७६८.८० डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. त्याच वेळी सोन्याचा जागतिक हाजीर भाव १ टक्के किंवा १७.४६ डॉलरने वाढत १,७६१.१३ प्रति औंसवर ट्रेंड करत होता.

जागतिक स्तरावर चांदीच्या किमतीतही सोमवारी सकाळी वाढ झाली आहे. ब्लूमबर्गनुसार, सोमवारी सकाळी चांदीचा हाजीर भाव ३.१३ टक्के म्हणजे ०.५२ डॉलरने वाढत १७.१३ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता. याशिवाय चांदीचा जागतिक वायदा भाव कॉमेक्सवर सोमवारी सकाळी २.८७ टक्के म्हणजे ०.४९ डॉलरने वाढत १७.५६ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता.