‘वायदे’ बाजारात ‘सोन्या-चांदी’च्या दरात ‘घसरण’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वायदा बाजारात सोन्याच्या किंमती शुक्रवारी घसरण झाल्याचे दिसले. एमसीएक्स एस्कचेंजवर शुक्रवारी सकाळी 10 वाजून 43 मिनिटांनी 5 जून 2020 चा सोन्याचा वायदा भाव 1.47 टक्के किंवा 641 रुपयांच्या घसरणीसोबत 43,002 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत होता. 3 एप्रिल 2020 च्या सोन्याच्या वायदा किंमती शुक्रवारी सकाळी यावेळी 1.36 टक्के किंवा 591 रुपयांच्या घसरणीसोबत 42,951 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत होते.

वायदा बाजारात शुक्रवारी सकाळी चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर 5 मे 2020 ला चांदीचा वायदा भाव शुक्रवारी सकाळी 10 वाजून 46 मिनिटांनी 0.87 टक्के किंवा 360 रुपयांच्या घसरणीसह 40,962 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड होताना दिसला. याशिवाय एमसीएक्सवर शुक्रवारी सकाळी याचवेळी 3 जुलै 2020 ची चांदीची वायदा किंमत 1.05 टक्के किंवा 436 रुपयांची घसरणीसह 41,150 रुपये प्रति किलोग्रॅम ट्रेंड होत होता.

आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर वृत्तानुसार शुक्रवारी सकाळी सोन्याचा आंतरराष्ट्रीय जागतिक हाजिर भाव 0.36 टक्के किंंवा 5.94 डॉलरच्या घसरणीसोबत 1625.40 डॉलर प्रति औंसवर ट्रेंड करत होता. तर चांदीचा आंतरराष्ट्रीय हाजिर भाव 0.90 टक्के किंवा 0.13 डॉलरच्या वाढीसह 14.53 डॉलर प्रति औंस ट्रेंड होत होता.

वायदा बाजारातील क्रुड ऑईलचा (कच्चे तेल) विचार केला तर एसीएक्सवर शुक्रवारी सकाळी यात तेजी पाहायला मिळाली होती. हे शुक्रवारी सकाळी 0.17 टक्के किंवा 3 रुपयांच्या वाढीसह 1,790 रुपये प्रति बॅरलवर ट्रेंड करत होते. कोरोना व्हायरसमुळे देशात बुधवार पासून 21 दिवस संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु झाले आहे. यामुळे भारतात हाजिर सोन्याचे बाजार बंद आहेत.