सोन्या-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गोल्ड फ्यूचरच्या किंमतीत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी वाढ झाल्याची पाहायला मिळाली. सोमवारी दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी गोल्ड फ्यूजरच्या भावात 0.39 टक्क्यांवर वाढ पाहायला मिळाली. एमसीएक्स एक्सचेंजवर ऑक्टोबर महिन्यात गोल्ड फ्यूचरचे भाव 0.39 टक्के टक्के अर्थात 146 रुपयांची वाढ पाहायला मिळाली होती. यामुळे ऑक्टोबर महिन्यात गोल्ड फ्यूचरचा भाव 37,843 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता.

एमसीएस्क एक्सचेंजमध्ये डिसेंबर महिन्यात गोल्ड फ्यूचरच्या भावात चांगली वाढ पाहायला मिळाली होती. एमसीएक्स एक्सचेंजवर सोमवारी 1 वाजून 15 मिनिटांनी डिसेंबर महिन्यात गोल्ड फ्यूचरच्या किंमतीमध्ये 0.31 टक्के अर्थात 119 रुपये वाढ पाहायला मिळाली होती. या तेजीने डिसेंबर महिन्यात गोल्ड फ्यूचरच्या किंमती 38.591 रुपये प्रति 10 ग्रॅम झाल्या होत्या.

चांदीचा विचार केला तर डिसेंबर महिन्यात चांदी फ्यूचरचे भाव सोमवारी 1 वाजून 20 मिनिटांनी एमसीएक्स एक्सचेंजवर 1.79 टक्के अर्थात 833 रुपयांनी वाढले होते. याच तेजीने चांदी फ्यूचरचे भाव 47,298 रुपये प्रति किलोग्रॅम झाले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोमवारी न्यूयॉर्कमध्ये 0.55 टक्क्यांच्या तेजीने सोने 1,523.50 डॉलर प्रति औंस पोहचले.

मागील आठवड्यात शुक्रवारी एचडीएफसी सिक्युरिटीज नुसार सोने 170 रुपयांच्या घसरणीबरोबर 38,390 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले होते तर चांदी 120 रुपयांच्या घसरणीने 47,580 रुपये प्रति किलोग्रॅमने स्थिरावली होती.

Visit : policenama.com