खुशखबर ! आठवड्याभरात सोन्याच्या दरात 2388 रूपयांची ‘घसरण’, चांदीच्या किंमतीत 4040 रूपयांची ‘घट’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरस, येस बँक प्रकरण आणि जगभरातील शेअर बाजारात घसरण झाल्याने गुंतवणूकदारांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किंमतीत मागील आठवड्यात 2,388 रुपयांची घसरण झाली. तर चांदी 4,040 रुपयांनी स्वस्त झाली आहे. उद्योजकांचे म्हणणे आहे की मार्जिन कमी होणे आणि इतर क्षेत्रात नुकसानाच्या भरपाईमुळे सोन्याच्या जबरदस्त बिकवालीच्या कारणाने मागील पाचव्या सत्रात सोन्याच्या किंमतीत घट झाली आहे.

इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेड (IBJA) च्या वेबसाइटवर उपलब्ध आकड्यांच्या मते 6 मार्चला बाजार बंद होतेवेळी 22 कॅरेट सोनं 44,237 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

मागील आठवड्यात सोन्याच्या दरात आलेली कमी –
– 10 मार्चला होळीमुळे सराफ बाजार बंद होता.
– 11 मार्चला सोनं 365 रुपयांनी घटल्याने 43,473 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले.
– 12 मार्चला सोनं 273 रुपयांनी स्वस्त झालं त्यामुळे सोनं 43,200 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
– 13 मार्च म्हणजे शुक्रवारी सोनं 1,351 रुपयांनी स्वस्त झालं, त्यामुळे सोनं 41,849 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.

चांदीचे दर कसे घटले –
– चांदीचे दर 6 मार्च 2020 ला 47,125 रुपये प्रति किलोग्रॅम स्तरावर होते.
– 10 मार्चला होळी होती त्यामुळे बाजार बंद होता.
– 11 मार्चला चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीत.
– 12 मार्चला चांदी 665 रुपयांनी स्वस्त झाली, त्यामुळे चांदी 45,340 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.
– 13 मार्चला चांदी 2,255 रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे चांदी 43,085 रुपये प्रति किलोग्रॅम झाली.