वायदा बाजार : सोनं ‘उच्चांकी’वर तर चांदी 70 हजार रूपये प्रति किलोच्या पुढं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बुधवारी सोन्याच्या भावात देशांतर्गत वायदा बाजारात मोठी वाढ झाली आहे. या वाढीसह सोन्याचा वायदा भाव विक्रमी पातळीवर पोहोचला आहे. एमसीएक्सवर बुधवारी दुपारी १.१३ वाजता ५ ऑक्टोबर २०२० चा सोन्याचा वायदा भाव १.०९ टक्के म्हणजे ५९६ रुपयाने वाढून ५५,१४७ रुपये प्रति १० ग्रामच्या सर्वोच्च विक्रमी पातळीवर ट्रेंड करत होता. याशिवाय ४ डिसेंबर २०२० चा सोन्याचा वायदा भावही यावेळी १.२२ टक्के म्हणजे ६६९ रुपयाने वाढून ५५,४०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या विक्रमी पातळीवर ट्रेंड करत होता.

देशांतर्गत वायदा बाजारात चांदीचा वायदा भाव ७१,००० रुपये प्रति किलोग्रॅमच्या पातळीवर गेला आहे. एका वृत्तसंस्थेनुसार, देशांतर्गत वायदा बाजारात चांदी २०११ नंतर पुन्हा एकदा ७१,००० रुपये प्रति किलोग्रॅमच्या मानसिक पातळीवर आली आहे. एमसीएक्सवर ४ सप्टेंबर २०२० चा चांदीचा वायदा भाव बुधवारी दुपारी १.१७ वाजता २.६४ टक्के म्हणजे १८४० रुपयाच्या तेजीसह ७१,६३७ रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होता. याशिवाय ४ डिसेंबर २०२० चा चांदीचा वायदा भाव यावेळी २.५७ टक्के म्हणजे १८३९ रुपयाने मोठ्या प्रमाणात वाढत ७३,३९० रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेंड करत होता.

दरवाढ चालू राहणार
केडिया अ‍ॅडव्हायझरीचे संचालक अजय केडिया म्हणतात की, चांदीमध्ये गुंतवणूकीची मोठी मागणी आहे, कारण ती औद्योगिक धातू आहे आणि सध्याच्या काळात औद्योगिक क्रियाकलाप वाढल्यामुळे चांदीची मागणी आणखी वाढेल. त्याचबरोबर एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांचे म्हणणे आहे की, सोन्या-चांदीमधील मूलभूत तत्त्वे सध्या बळकट आहेत आणि भविष्यातही किंमती कायम राहण्याची शक्यता आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्लूमबर्गनुसार, बुधवारी सकाळी कॉमेक्सवर सोन्याचा वायदा भाव ०.७९ टक्के म्हणजे १५.९० डॉलरने वाढून २०३६.९० डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता. याशिवाय सोन्याचा जागतिक हाजीर भाव यावेळी ०.१९ टक्के म्हणजे ३.८७ डॉलरने वाढून २०२३.०८ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी
आंतराराष्ट्रीय बाजारात चांदीचा वायदा भाव वाढला आणि हाजीर भावात घट झाली आहे. कॉमेक्सवर बुधवारी सकाळी चांदीचा वायदा भाव ०.३९ टक्के म्हणजे ०.१० डॉलरने वाढून २६.१३ डॉलर प्रति औसवर ट्रेंड करत होता. तसेच चांदीचा जागतिक हाजीर भाव यावेळी ०.१० टक्के म्हणजे ०.०३ डॉलरने घसरत २५.९८ डॉलरवर ट्रेंड करत होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like