Gold Rate : सोन्याच्या किंमतीत घसरण, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या नवीन दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय घसरण दिसून आली. यामुळे स्पॉट मार्केटमध्ये सलग तीन दिवस सोन्या चांदीच्या वाढत्या किंमतींचे सत्र थांबले आहे. शुक्रवारी सोन्याच्या किंमती दहा ग्रॅम पातळीवर 263 रुपयांनी घसरून 48,861 रुपयांवर बंद झाल्या. मागील सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 49,124 रुपये होते. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, जागतिक पातळीवरील कमकुवततेमुळे दिल्लीत मौल्यवान धातूंच्या किंमती कमी झाल्या.

चांदीची किंमत
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, दिल्लीत चांदी 806 रुपयांनी घसरून 66,032 रुपयांवर आली. मागील सत्रात चांदीचा दर प्रतिकिलो 66,838 रुपये होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले, “कॉमेक्स (न्यूयॉर्क आधारित कमोडिटी एक्सचेंज) वरच्या कमकुवततेमुळे दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅम 263 रुपयांनी घसरले. यामुळे सलग तीन दिवसांपासून सुरु असलेले वाढत्या किमतीचे सत्र थांबले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव घसरून प्रति औंस 1,861 डॉलरवर राहिले. त्याच वेळी चांदी प्रति औंस 25.52 डॉलरवर होती.

फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव
2021 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 04:49 वाजता मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) डिलीव्हरी वाल्या सोन्याचे भाव 578 रुपयांनी म्हणजेच 1.17 टक्क्यांनी घसरले आणि ते प्रति 10 ग्रॅम 48,870 रुपयांवर गेले. मागील सत्रात फेब्रुवारी महिन्यातील सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 49,448 रुपये होता. दुसरीकडे, एप्रिलमध्ये डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 548 रुपये म्हणजेच 1.10 टक्के घसरणीसह प्रति दहा ग्रॅम 49,048 रुपयांवर होता. त्याच वेळी मागील सत्रात एप्रिल कॉन्ट्रॅक्ट सोन्याचे दर 10 ग्रॅम 49 4959 रुपये होते.