सोनं झालं ‘स्वस्त’ तर चांदी ‘महागली’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत सराफ बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत घसरणं झाली आहे. दिल्लीत शुक्रवारी सोने 26 रुपयांनी स्वस्त झाले. यामुळे सोनं 38,895 रुपये झाले. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार गुरुवारी दिल्लीत सोने 38,921 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. भारतीय रुपयात घसरणं आल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घसरणं पाहायला मिळाली.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी शुक्रवारी सांगितले की 24 कॅरेट सोने 26 रुपयांनी स्वस्त झाले. ते म्हणाले की रुपयाच्या मूल्यात घसरणं आल्याने सोन्याच्या किंमती देखील कमी झाल्या. ते म्हणाले की हाजिर मूल्य शुक्रवारी एक डॉलरच्या तुलनेत 10 पैशांनी घसरले.

चांदीच्या किंमतीत शुक्रवारी वाढ होताना दिसली. चांदी शुक्रवारी 52 रुपयांनी महागली. यामुळे चांदी 45,547 रुपये प्रति किलोवर पोहचली. मागील सत्रात चांदी 45,495 रुपये प्रति किलो ग्रॅम होती. औद्योगिक क्षेत्रात आणि शिक्के उद्योगात लिवाली वाढल्याने चांदीचे दर वाढले.

आतंरराष्ट्रीय स्तराचा विचार केला तर सोने शुक्रवारी न्यूयॉर्कमध्ये घसरण होऊल 1,473 डॉलर प्रति औंसव पोहोचली, चांदीमध्ये घसरण येऊन चांदी 16.88 डॉलर प्रति औंस झाली. अमेरिकेच्या अध्यक्षांनी संकेत दिल्यानंतर गुंतवणूकदारांनी अमेरिका चीनमध्ये योग्य दिक्षेने चर्चा असल्याची अपेक्षा ठेवल्याने शुक्रवारी एशियन स्टॉक मार्केटमध्ये वाढ होऊन ट्रेंडमध्ये होता.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like