सोनं-चांदी झालं ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – सोन्याच्या भावात आज मंगळवारी घसरणं आली आहे. सोनं मंगळवारी 95 रुपयांनी स्वस्त झालं. यामुळे दिल्लीत सोने 38,460 रुपयांवर आलं. मागणीत कमी आणि रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरणं झाली आहे. सोमवारी दिल्लीत सोने 38, 555 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल यांनी सांगितले की मंगळवारी 24 कॅरेट सोन्याची किंमती 95 रुपयांनी घसरली. ते म्हणाले की मागणीत आलेली कमी आणि रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीत घसरणं आली आहे. पटेल म्हणाले की मंगळवारी हाजिर रुपया एक डॉलरच्या तुलनेत 15 पैशांनी मजबूत झाला.

सोन्याच्या किंमतीत आलेल्या घसरणीबरोबर चांदीच्या किंमतीत देखील कमी आली आहे. मंगळवारी चांदी 128 रुपयांनी स्वस्त झाली. चांदीच्या किंमतीत घसरणं आल्याने चांदी 44,607 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. सोमवारी चांदी 44,735 रुपये प्रति किलोग्रॅम होती. औद्योगिक क्षेत्रात आणि शिक्के बाजारात लिवाली कमी झाल्याने चांदीच्या किंमतीत घसरणं झाली.

आंतरराष्ट्रीय स्तरावर मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये सोने 1,463 डॉलर प्रति औंस झाले तर चांदी 16.62 डॉलर प्रति औंस झाली. पटेल म्हणाले की अमेरिका आणि चीनमधील व्यापार करारामुळे सोन्या चांदीच्या बाजारात घसरणं दिसत आहेत.

Visit : Policenama.com