Gold Rate Today : सोन्याच्या किंमती घसरल्या, चांदीमध्ये मोठी घट, जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशांतर्गत सराफा बाजारात सोमवारी सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये घसरणीची नोंद झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, सोमवारी देशाच्या राजधानीत सोन्याच्या स्पॉट किंमतीत प्रति 10 ग्रॅम 326 रुपयांची घट झाली. या घसरणीमुळे सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 52,423 रुपयांवर आली आहे. सिक्युरिटीजच्या मते रुपयाचे मूल्य मजबूत झाल्याने सोन्याच्या देशांतर्गत किंमतीत ही घसरण दिसून आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 52,749 रुपयांवर बंद झाले होते.

त्याचबरोबर चांदीच्या किंमतीत सोमवारी मोठी घसरण नोंदवली गेली. सोमवारी चांदीच्या भावात 945 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे चांदीचा दर प्रतिकिलो 68,289 रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे मागील सत्रात चांदीचा भाव 69,234 रुपये प्रति किलो होता.

देशांतर्गत शेअर बाजारात घसरण असूनही भारतीय रुपया सोमवारी एका डॉलरच्या तुलनेत सात पैशांनी वाढून 73.38 वर बंद झाला.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी सोन्याचा भाव प्रति औंस 1940 डॉलर होता. दुसरीकडे, चांदीचा भाव प्रति औंस 26.50 डॉलर होता.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, अमेरिकन चलन डॉलरच्या रिकव्हरीमुळे मौल्यवान धातूंचे भाव दडपणाखाली आहेत.

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे व्ही. पी. (कमोडिटीज रिसर्च) नवनीत दमानी म्हणाले की डॉलरच्या किंमतीमुळे सोन्याच्या किंमती पूर्वीच्या तुलनेत खाली आल्या आहेत.

फ्युचर्स मार्केटमध्ये प्रचंड घट
सोमवारी सायंकाळी सोन्या-चांदीच्या फ्युचर्सच्या किंमतीत मोठी घसरण झाली. ऑक्टोबर वायद्याच्या सोन्याचे भाव सध्या एमसीएक्सवर प्रति 10 ग्रॅम 51,132 रुपयांवर आहेत, ते 583 रुपयांनी घसरले आहेत. त्याचबरोबर, एमसीएक्सवर 1,335 रुपयांची घसरण होऊन चांदीचा भाव प्रतिकिलो 66,542 रुपये होता.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like