सलग दुसऱ्या दिवशी सोनं – चांदी ‘स्वस्त’, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सराफ बाजारात मंगळवारी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. मंगळवारी सोने 68 रुपयांनी स्वस्त झाले. त्यामुळे सोने 38,547 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मागणीतील कपात आणि रुपयातील तेजी या कारणाने सोन्याच्या किंमतीत घसरण झाली. सोमवारी दिल्लीत 38,615 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली होती.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की मंंगळवारी दिल्ली 24 कॅरेट सोने 68 रुपयांनी स्वस्त झालं. रुपयात तेजी आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत आलेली घसरणं याचा परिणाम स्थानिक बाजारात सोन्याच्या किंमतीवर झाला. पटेल म्हणाले की भारतात स्थानिक बाजारात मागणी नसल्याने सोन्याचा किंमतीत घसरणं झाली आहे.

अमेरिकन डॉलरमध्ये 8 पैशांनी मजबूत झाला. ज्यानंतर एक डॉलर 71.66 रुपये झाला. रुपयांतील तेजी विदेशी उत्पन्नात इनफ्लो आणि शेअर बाजारात वाढ हे कारण आहे. मंगळवारी चांदी देखील स्वस्त झाली. मंगळवारी चांदीमध्ये 39 रुपयांना घसरणं आली. या घसरणीमुळे चांदी 45,161 रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. सोमवारी चांदी 45,200 रुपये प्रति किलोग्रॅम होती. औद्यागोक क्षेत्रात आणि शिक्के बाजारात लिलावी घसरणं आल्याने चांदीच्या किंमतीत घसरणं पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी न्यूयॉर्कमध्ये सोने 1,455.30 डॉलर प्रति औंस आणि चांदी 16.88 डॉलर प्रति औंसवर स्थिरावली.

Visit : Policenama.com