… म्हणून सोनं पुन्हा ‘महागलं’, जाणून घ्या आजचे सोन्या-चांदीचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रुपया गडगडल्याने देशांतर्गत सराफ बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात तेजी आली. सोनं गुरुवारी 31 रुपयांनी महागलं. भारतीय रुपया गुरुवारी डॉलरच्या तुलनेत 75 रुपयांवर पोहोचला. बुधवारी सोनं 40,687 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. याशिवाय चांदीच्या किंमतीत देखील तेजी आली. चांदीच्या भावात 190 रुपयांची घसरण झाली.

सोन्याचे दर –
गुरुवारी सोनं 31 रुपयांनी महागलं, त्यामुळे आज सोन्याची किंमत 40,718 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. बुधवारी सोनं 40,687 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

चांदीचे दर
गुरुवारी चांदीच्या दरात घसरण झाली. चांदी 190 रुपयांनी स्वस्त झाली. त्यामुळे चांदी 35,444 रुपये प्रति किलोग्रॅम झाली. बुधवारी चांदी 35,634 रुपये प्रति किलो होती.

दिल्लीत गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचा हाजिर भाव 31 रुपयांनी वधारला. रुपया अचानक गडगडल्याने सोन्यात ही तेजी दिसून आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्या चांदीच्या किंमतीत गुरुवारी स्थिरता पाहायला मिळाली. सोनं 1,482 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाले तर चांदी 11.97 डॉलर प्रति 28.34 ग्रॅम झाली.