पुणे, ठाणे, नवी मुंबईसह ‘या’ 9 शहरात फ्लॅटची विक्री 25 टक्क्यांनी घसरली, नवीन स्कीममध्ये देखील 45% ‘घसरण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील 9 शहरात घर विक्रीत मोठे घट झाली झाली आहे. जुलै आणि सप्टेंबरच्या कालावधीत यात 25 टक्क्यांनी घसरण होऊन 65,799 यूनिट पाहायला मिळाली. नव्या योजना सादर करुन देखील यात 45 टक्क्यांनी घसरण पाहायला मिळाली. रिअल इस्टेट ब्रेकिंग कंपनी प्रॉप टायगर यांच्या रिपोर्टनुसार ही माहिती समोर आली. ग्राहकांची धारणा आणि मागणीत कमी आल्याने ही घसरण झाली.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एनारॉक आणि जेएलएल इंडिया यांच्या रिपोर्टनुसार सात प्रमुख शहरात जुलै – सप्टेंबरच्या कालावधीत घर विक्रीत क्रमश 18 टक्के आणि एक टक्के घसरण दिसून आली. या सर्वेमध्ये मुंबई महानगर क्षेत्र (नवी मुंबई आणि ठाण्यासह) पुणे, नोएडा (ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेस वे सह), गुरुग्राम (भिवानी, दारुहेडा आणि सोहनासह) बेंगळूरु, चेन्नई, हैदराबाद, कोलकत्ता आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. प्रॉप टायगर यांनी आपल्या रिअल इंसाइट रिपोर्टमध्ये सांगितले की 9 प्रमुख शहरामध्ये 65,799 युनिट घरांची विक्री झाली. या कालावधीत मागच्या वर्षात ही संख्या 88,078 युनिट होती.

एलारा टेक्नोलॉजी समूहचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अग्रवाल यांनी सांगितले की सरकारने नॉनबँकिंग फायनान्स कंपन्यांच्या समस्येचे समाधान करण्यास सुरुवात केली आहे. परंतू यानंतर सप्टेंबरमध्ये तिमाहीमध्ये नव्या घरांच्या युनिटमध्ये सादरीकरणातील घसरण थांबली नाही.

एनबीएफसी भारतातील रिअल इस्टेटला आर्थिक पुरवठा करते आणि तोच त्यांचा प्रमुख स्त्रोत आहे. याशिवाय सण असल्याने ग्राहकांनी पैसे वाचवण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गुंतवणूक केली या कारणाने तिमाहीच्या दरम्यान घरविक्रीत घट दिसून आली.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like