११ वर्षांत बँकांमध्ये २.०५ लाख कोटींचे घोटाळे ; ‘या’ 3 मोठ्या बँका घोटाळयात ‘अग्रेसर’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरातील बँकांमध्ये होणाऱ्या आर्थिक घोटाळ्यांनी उच्चांक गाठला आहे. गेल्या ११ वर्षांमध्ये सरकारी व खासगी व विदेशी बँकांमध्ये तब्बल ५० हजारांपेक्षा अधिक आर्थिक घोटाळे झाले आहेत. त्यांचा सर्वाधिक फटका आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि एचडीएफसी बँक यांना बसला आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितूनुसार , २००८-९ ते २०१८-१९ या १० वर्षांच्या काळात ५३ हजार ३३४ घोटाळे झाले. यात बँकांना तब्बल २.०५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे . सर्वाधिक ६,८११ घोटाळे आयसीआयसीआाय बँकेत झाले आहेत. त्यातून बँकेला ५,०३३ कोटी ८१ लाख रुपयांना फटका बसला आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार , एसबीआयमधील ६,७९३ घोटाळ्यांत २३ हजार ७३४ कोटी ७४ लाख रुपये बुडाले. एचडीएफसी बँकेत २,४९७ घोटाळे झाले. त्यातून बँकेला १,२०० कोटी ७९ लाख रुपयांचा फटका बसला. बँक ऑफ बडोदामध्ये या कालावधीत २,१६० प्रकरणे समोर आली असून १२ हजार ९६२ कोटी ९६ लाख रुपयांचा घोटाळा झाला आहे. पंजाब नॅशनल बँकेत २८,७००.७४ कोटी रुपयांचे २,०४७ घोटाळे झाले. तर अ‍ॅक्सिस बँकेत (५,३०१.६९ कोटी) रुपयांचे १,९४४ घोटाळे झाले.

विदेशी बँकांमध्येही घोटाळे –

आरबीआयच्या माहितीनुसार , भारतामध्ये कार्यरथ असणाऱ्या विदेशी बँकांमध्येही घोटाळे झाले आहेत. अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्पोरेशन, सिटी बँक, हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन आणि रॉयल बँक ऑफ स्कॉटलँड यांचा त्यात समावेश आहे.अमेरिकन एक्स्प्रेस बँकिंग कॉर्पोरेशनमध्ये ८६. २१ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

तांब्याची बॉटल खरेदी करताना घ्या ही काळजी

मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे