खुशखबर ! आयकर विभागाने ६४,७०० कोटी रुपये दिले ‘रिफंड’, करदात्यांना फायदा होणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयकर विभागाने चालू वित्तीय वर्षात ६४,७०० कोटी रुपये रिफंड करण्यात आला आहे. अर्थ मंत्री निर्मला सीतारामण यांनी ही माहिती दिली आहे. लोकसभेत एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मुल्यांकन वर्ष २०१८-१९ साठी ६.४९ कोटी पेक्षा आधिक इलेक्ट्रॉनिक रिटर्न जमा केले आहेत. तर मुल्यांकन वर्ष २०१७-१८ मध्ये १८.५५ टक्के वाढून ५.४७ कोटी रुपयांपेक्षा अधिक होते.

सीतारामण यांनी बोलताना सांगितले की, सरकारने छोट्या करदात्यासह सर्व करदात्यांना रिफंड देण्यासाठी प्राथमिकता देण्यात येईल. आयटीआरवर जोमाने कारवाई करण्यात येत आहे आणि रिफंड देखील जारी करण्यात येत आहेत. त्या म्हणाल्या की तंत्रज्ञानाचा उपयोग वाढत असताना आयटीआर प्रक्रियेसाठी लागणारा वेळ कमी होत चालला आहे.

वित्त वर्ष १८ जून २०१९ पर्यंत ६४,७०० कोटी रुपयांचे रिफंड याआधीच देण्यात आलेला आहे आणि वित्तवर्ष २०१८-१९ मध्ये जारी रिफंड करण्यात आलेली एकूण रक्कम १.६१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. निर्मला सीतारामण यांनी पुढे सांगितले की, करदात्यांना २६.९ कोटी मेल आणि एसएमएस पाठवण्यात आले जेणे करुण ते आपला कर वेळच्या वेळी भरु शकतील.

सिने जगत –

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही

..म्हणून ‘बिग बॉस’ बॅन करण्यासाठी वकिलाची तक्रार दाखल

अभिनेता आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिराने ‘तेथे’ फोटो काढला, त्यानंतर मात्र,.