वाढली ITR फाइल करण्याची अंतिम मुदत, GST वार्षिक परतावा भरण्यासाठीही मिळेल अधिक वेळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्यांनी अद्याप 2019-20 या आर्थिक वर्षासाठी आयकर विवरणपत्र भरलेले नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आयकर विवरणपत्र भरण्यासाठी सरकारने बुधवारी पुन्हा मुदतवाढ दिली आहे. वित्त मंत्रालयाने म्हटले की, कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळेेे करदात्यांच्या समोर त्यांची वैधानिक पालनासमोरील आव्हानांचा विचार करता सरकारने विविध अनुपालन करण्याची अंतिम तारीख पुढे ठेवली आहे.

अशाप्रकारे, आर्थिक वर्ष 2019-20 साठी प्राप्तिकर विवरण (आयटीआर) भरण्याची अंतिम तारीख आता 10 जानेवारी 2021 झाली आहे. जी आधी 31 डिसेंबर 2020 रोजी होते. त्याशिवाय कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2019-20 साठी प्राप्तिकर परतावा भरण्याची अंतिम मुदत 15 दिवसांपर्यंत वाढवून 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत ठेवली आहे. केंद्रीय जीएसटी अधिनियम, 2017 च्या अंतर्गत सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी वार्षिक परतावा सादर करण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारीपर्यंत वाढविली आहे. प्राप्तिकर विभागाने ही माहिती दिली आहे. ज्यांच्या खात्यांचे लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे अशा करदात्यांकरिता मूल्यांकन 2019 – 20 साठी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम मुदत 15 फेब्रुवारी केली आहे. विवाद-से विश्वास योजनेंतर्गतल घोषित करण्याची अंतिम तारीखदेखील 31 डिसेंबर 2020 वरून 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

सीबीडीटीने जारी केले दीड लाख कोटींपेक्षा जास्त रिटर्न
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 1.56 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त परतावा जारी केला आहे. अधिकृत निवेदनानुसार 1 एप्रिल ते 27 डिसेंबरदरम्यान 1.33 कोटीहून अधिक करदात्यांना परतावा मिळाला आहे. प्राप्तिकर विभागाने एका ट्वीटमध्ये माहिती दिली की आतापर्यंत 1.31 कोटी वैयक्तिक करदात्यांना 50,554 कोटी रुपयांचे परतावे देण्यात आले आहेत.

त्याचबरोबर कॉर्पोरेट कराच्या 2.03 लाख प्रकरणांमध्ये 1.06 लाख कोटीचा परतावा देण्यात आला आहे. प्राप्तिकर विभागाने 2019 – 20 या आर्थिक वर्षासाठी आत्तापर्यंत भरलेल्या परताव्याची माहिती दिली. विभागानुसार 29 डिसेंबरपर्यंत एकूण 4.54 कोटी रिटर्न भरण्यात आले. आर्थिक वर्ष 2019-2020 साठी दंड न घेता परतावा भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर आहे. गेल्या वर्षी शेवटची तारीख 31 ऑगस्ट होती. शेवटच्या तारखेपर्यंत एकूण 5.65 लोकांनी परतावा दाखल केला होता.