Flipkart नं भारतात सुरु केली होलसेल ई-कॉमर्स सेवा, अमेझॉनसह अनेक कंपन्यांशी करावी लागेल स्पर्धा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  फ्लिपकार्ट ग्रुपच्या फ्लिपकार्ट होलसेलने नवीन ऑनलाईन होलसेल सेवा लॉन्च केली आहे. याच्या सहाय्याने कंपनी होलसेल मार्केट मध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे आणि अमेझॉन सारख्या अन्य कंपन्यांशी स्पर्धा करणार आहे. फ्लिपकार्ट होलसेल अँपवर देखील उपलब्ध आहे. सध्या बेंगलोर, गुरुग्राम आणि दिल्लीत सेवा सुरु करण्यात आली आहे. फ्लिपकार्टने माहिती दिली की ते आणखी 20 शहरांमध्ये या प्लॅटफॉर्मचा विस्तार करणार आहेत आणि वर्षाच्या शेवटपर्यंत ग्रॉसरी देखील येण्याची शक्यता आहे.

कंपनीने सांगितले की दोन महिन्यात दोन लाख उत्पादनं लिस्ट केली जाऊ शकतात आणि पुढील काही दिवसात 50 ब्रँड्स आणि 250 स्थानिक उत्पादक यामध्ये सहभागी होऊ शकतात. फ्लिपकार्टने काही दिवसांपूर्वी वालमार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची 100% भागीदारी खरेदी केली होती.

फ्लिपकार्टला अमेझॉन आणि उडाण सारख्या आणखी काही कंपन्यांशी स्पर्धा करावी लागेल. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या मते अमेझॉन आणि जिओमार्ट कंपन्यांसोबत अन्य ई-कॉमर्स कंपन्यांशी फ्लिपकार्टला स्पर्धा करावी लागेल.

मुकेश अंबानीच्या मालकीची असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची सब्सिडिअरी जिओमार्ट देखील मॉम अँड पॉप स्टोअरला पुढे नेण्याच्या प्रयत्नात आहे. आरआयएलने या वर्षी फेसबुक आणि अल्फाबेट सहित जगातील गुंतवणुकीत आपल्या डिजिटल शाखेसाठी 20 अरब डॉलर पेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे. यामुळे जिओमार्टला सपोर्ट मिळण्याची आशा आहे.