Indigo 3,499 रुपयांत देत आहे अंतरराष्ट्रीय उड्डाणाची संधी, चार दिवसांत करा तिकिट बुकिंग

नवी दिल्ली : इंडिगोने आपल्या अंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या स्वस्त तिकिटांसाठी चार दिवसांची विक्री योजना मंगळवारपासून सुरू केली आहे. हे तिकिट 1 मार्च ते 30 सप्टेंबर दरम्यानच्या प्रवासाठी असेल. विमान कंपनीच्या या तिकिटांची विक्री 18 फेब्रुवारी 2020 ते 21 फेब्रुवारी 2020 पर्यंत सुरू राहिल. या अंतर्गत कंपनीचे अंतरराष्ट्रीय उड्डाणाचे तिकिट सर्व खर्चासह 3,499 रुपयांपासून सुरू होत आहे. कंपनीने म्हटले आहे की, त्यांच्या नेटवर्कमध्ये अंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी एकुण अडीच लाख सीट उपलब्ध आहेत.

एयरलाईन अबू धाबी, बँकॉक, ढाका, सिंगापुर, दुबई, फुकेट, इस्तंबुल आणि इतर अनेक डेस्टिनेशनसाठी उड्डाणांवर सूट दिली जात आहे. कमी प्रवास भाड्यासह, एयरलाईन अतिरिक्त कॅशबॅकसुद्धा देत आहे, ज्याचा फायदा एचडीएफसी बँक, पेझॅप, बँक ऑफ बड़ोदा आणि इंड्सइंड बँकेचा वापर करून घेता येईल.

You might also like