कामाची गोष्ट ! ‘या’ महिन्यापासून काही मिनीटांमध्ये मिळणार Aadhaar व्दारे e-PAN, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकार या महिन्यात आधारची माहिती दिल्यावर तात्काळ ऑनलाइन पॅनकार्ड देण्याची सुविधा करेल. महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी ही माहिती दिली. 2020 – 21 च्या अर्थसंकल्पात एक प्रणाली (सिस्टिम) सुरु करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे, ज्या माध्यमातून AADHAAR च्या आधारे पॅन क्रमांक तात्काळ ऑनलाइन देण्यात येईल. यासाठी अर्ज भरणे देखील आवश्यक नाही. यामुळे पॅन देण्याची प्रक्रिया आणखी सोपी होईल. ही सुविधा कधीपासून सुरु होईल यावर विचारले असता पांडे म्हणाले की सिस्टमवर काम सुरु आहे. या महिन्यात ही सिस्टम सुरु होईल.

ही सुविधा कशी काम करेल यावर बोलताना ते म्हणाले की यासाठी तुम्ही आयकर विभागाच्या वेबासाइटवर जाऊ शकतात आणि आधार क्रमांक तेथे टाकू शकतात. आधार रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक पासवर्ड म्हणजेच ओटीपी येईल. आधारमधील माहितीचे सत्यापन करण्यासाठी ओटीपीचा वापर होईल. त्यानंतर तात्काळ पॅन क्रमांक देण्यात येईल. त्यानंतर व्यक्ती ई पॅन कार्ड डाऊनलोड करु शकतो.

या सर्वाचा फायदा हा होईल की करधारकांना अर्ज भरणे आणि कर विभागात जमा करण्यापासून सुटका मिळेल. याशिवाय करधारकांना त्यांच्या निवासस्थानी पॅन कार्ड पाठवणे सोपे होईल. सरकारने पॅन आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. 30.75 कोटी पेक्षा अधिक पॅन आधारला लिंक आहेत. असे असले तरी 27 जानेवारी 2020 पर्यंत 17.58 कोटीपेक्षा आधिक पॅन आधारला जोडणे बाकी आहे. पॅनद्वारे आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2020 आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आपल्या 2020-21 च्या अर्थसंकल्पात सांगितले की या देशात कमाई करणाऱ्यांचा सन्मान केला पाहिजे आणि जीवन जगणे आणि व्यवसाय करणे सोपे व्हावे यासाठी कर विभाग निष्पक्ष असणे आवश्यक आहे.