Health Insurance : विकण्याच्या नावावर होतेय फसवणूक, IRADAI नं लोकांना केलं सावध, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कोरोना काळात देशातील नागरिकांचा आरोग्य विम्याकडे ओढा चांगलाच वाढल्यांचं दिसलं आहे. याचाच फायदा घेऊन बऱ्याच अनधिकृत कंपन्यां आरोग्य विमा विकून ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फसवत असल्याची माहिती मंगळवारी IRADAI ने दिली. याबद्दल ग्राहकांना सावधानतेचा इशारा IRADAI ने दिला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRADAI) सांगितले की, काही अनधिकृत संस्था रुग्णालयाच्या खर्चातील आकर्षक सूट दाखवून आरोग्य विमा विकत आहेत.

IRADAI काढलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये असं सांगितले आहे की, IRADAI रजिस्टर्ड कंपनी किंवा त्यांचे अधिकृत एजेंट आणि मध्यवर्ती विमा कंपन्याच आरोग्य विमा विकू शकतात. जर तुम्ही यातील सोडून दुसरं कोणाकडून आरोग्य विमा घेत असाल तर तुम्ही स्वतःलाच अडचणीत आणत आहात, असंही IRADAI ने सांगितले आहे. देशातील अधिकृत मान्यता प्राप्त विमा कंपन्यांची माहिती IRADAIच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

जर तुम्हाला कसलाही संशय आला तर तुम्ही त्या कंपनीबद्दलची माहिती IRADAIच्या वेबसाईटवर क्रॉस चेक करु शकता. तसेच त्या विमा कंपनीला संपर्क करण्याचाही प्रयत्न केला पाहिजे. फेक कॉलपासून सावध राहिलं पाहिजे. त्यामुळे कधीही कोणताही विमा घेताना विमा कंपनीला किंवा रजिस्टर्ड एजेंटसोबत डिल केली पाहिजे.