Income Tax Return : आयटीआर दाखल करण्यासाठी ‘आयकर विभागा’नं करदात्यांना दिला इशारा, गमावू नका ‘ही’ शेवटची संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण अद्यापही आर्थिक वर्ष 2019-20 किंवा मूल्यांकन वर्ष 2019-20 साठी आयकर विवरण (ITR) दाखल केलेले नसेल तर आपल्याकडे आज शेवटची संधी आहे. आपण केवळ आजपर्यंतच यासाठी आयटीआर दाखल करू शकता. आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2021 आहे. आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत सरकारने गेल्या महिन्यात वाढविली होती. आयकर विभागानेही ट्वीट करून करदात्यांना आयकर दाखल करण्यास सांगितले आहे.

आयकर विभागाने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, ‘2020-21 या वर्षासाठी तुम्ही आयटीआर दाखल केलेला नाही का? कृपया वाढविण्यात आलेली शेवटची तारीख 10 जानेवारी 2021 पर्यंत यास दाखल करा, आपला आयटीआर आत्ता incometaxindiaefiling.gov.in ला भेट देऊन दाखल करा.

कोरोना विषाणूच्या साथीमुळे करदात्यांना होणार्‍या गैरसोयींमुळे आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची मुदत अनेक वेळा वाढविली आहे. शेवटच्या वेळी विभागाने मागील महिन्याच्या शेवटाला मुदत वाढविली होती. ज्या करदात्यांना ऑडिटची आवश्यकता नाही, अशांसाठी मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली होती. त्याच वेळी, ज्या करदात्यांना ऑडिट आवश्यक आहे त्यांच्यासाठी मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी आयटीआर दाखल करण्याची मुदत 15 फेब्रुवारी आहे.

या व्यतिरिक्त कंपन्यांनी आर्थिक वर्ष 2019-20 साठी आयकर विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 15 दिवसांनी वाढवून 15 फेब्रुवारी 2021 पर्यंत केली आहे. केंद्रीय जीएसटी अधिनियम, 2017 अंतर्गत सरकारने आर्थिक वर्ष 2019-20 साठी वार्षिक परतावा सादर करण्याची अंतिम तारीख देखील वाढवून 28 फेब्रुवारी केली आहे.