Budget 2019 : ‘GST’मध्ये मर्ज होणार १२ आणि १८ टक्क्यांचे स्लॅब, माजी अर्थमंत्री जेटलींनी वर्तवली शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वस्तू आणि सेवा कराला (GST) लागू होऊन २ वर्ष झाल्यानंंतर आता त्यासंबंधी माजी अर्थ मंत्री अरुण जेटली यांनी काही महत्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी सांगितले की महसूल वाढवण्यासाठी जीएसटीचे १२ आणि १८ टक्के लागणारे कर आता एकत्र केली जाण्याची शक्यता आहे. तसेच त्यांनी सांगितले की जीएसटी मध्ये कराचे स्लॅब कमी केल्याने देशाला ९० हजार कोटींचा तोटा झाला आहे. यासंबंधीची पोस्ट अरुण जेटली यांनी फेसबूकवर टाकली आहे.

सरकारला ९० हजार कोटीचा तोटा
अरुण जेटली यांनी सांगितले की, वापरण्यात येणारी सर्वात जास्त वस्तू १८ टक्के, १२ टक्के आणि ५ टक्के या स्लॅब मधील आहेत. ते असेही म्हणाले की मागील २ वर्षात जीएसटी कौन्सिलने कराचे दर कमी केले आहेत. यामुळे सरकारला ९० हजार कोटीचा तोटा सहन करावा लागला.

महसूल वाढवण्यासाठी जीएसटी केवळ २ स्लॅबमध्ये राहिलं. जेटली यांनी सांगितले की लग्जरी वस्तूवर लागवण्यात आलेला २८ टक्के स्लॅब जवळपास संपला आहे. सर्व स्लॅबमधील कर कमी केेल्याने सरकारच्या तिजोरीवर भार निर्माण झाला आहे.

करदात्यांची संख्या ८४ टक्क्यांनी वाढली
१ जुलै २०१७ सर्व स्थानिक कर बंद करुन देशात एकच कर लागू करण्यात आला होता. अरुण जेटली यांनी लिहले आहे की जीेएसटी लागू झाल्यानंतर २० राज्याच्या तिजोरीत १४ टक्क्यांनी वाढ झाली, हेच जीएसटीच्या यशाचे सर्वात मोठे उदाहरण आहे. जीएसटी कर हा उपभोक्त्यांना आणि करदात्यांना दोघांना ही अनुकूल आहे. तसेच त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की मागील दोन वर्षात देशातील करदात्यांची संख्या ८४ टक्क्यांनी वाढली आहे.

सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेल आहे गुणकारी

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे

महिलांनो, बाळंतपणानंतर पुन्हा मिळवता येऊ शकतो कमनीय बांधा