ललित मोदी विकतायेत त्यांचा कौटूंबिक व्यवसाय, जाणून घ्या किती मोठा आहे KK Modi समूह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केके मोदी ग्रुपच्या अनेक कंपन्यांचा हिस्सा विकला जाणार आहे. उद्योगपती केके मोदी यांचा मुलगा ललित मोदी यांनी सोमवारी ट्विट करून ही माहिती दिली. ललित मोदी यांच्या म्हणण्यानुसार, हा समूह लिस्टेड सिगारेट कंपनी गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेडमधील आपला हिस्सा विकेल. मार्लबोरो ब्रँडच्या सिगरेट्स विकणारी कंपनी गॉडफ्रे फिलिप्समध्ये ललित मोदी आणि त्यांच्या कुटुंबाचा 47.09% हिस्सा आहे. मार्लबोरो ब्रँडचा मालक फिलिप मॉरिस ग्लोबल ब्रँड्स इंक. कंपनीत 25.1% हिस्सा आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये केके मोदी यांचे निधन झाले.

सोमवारी ललित मोदी यांनी ट्वीटरच्या माध्यमातून सांगितले की, “… केके मोदी समूहाची सर्व मालमत्ता विकली जाईल.” इतर तीन विश्वस्तांना व्यवसाय चालवायचा होता परंतु माझ्या वडिलांच्या निधनानंतर त्याचे मूल्य कमी होईल असे मला वाटते. मी विक्रीच्या बाजूने होतो. ”

आयपीएलची सुरूवात करणारे ललित मोदी हे 2010 पासून लंडनमध्ये वास्तव्यास आहेत. क्रिकेट लीगच्या संचालक संदर्भात त्याच्यावर अनेक आर्थिक अनियमिततेचे आरोप आहेत. दरम्यान, नंतरच्या ट्विटमध्ये मोदींनी हे स्पष्ट केले की प्रस्तावित विक्री योजनेत काही व्यवसायांचा समावेश नाही आणि हे व्यवसाय त्यांचे कुटुंबिय सदस्य सामी मोदी, बीना मोदी आणि चारू मोदी सतत चालवतील. ललित मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “‘colorbar/ego/Beacon Travels आणि एज्युकेशन व्यवसाय वगळता, http://modi.com वर सूचीबद्ध सर्व मालमत्ता सर्व कंपन्या, भूखंड आणि इतर कंपन्यांमधील गुंतवणूकीची विक्री असेल ….”

मिळालेल्या माहितीनुसार, हे व्यवसाय सोडून डायरेक्त्त सेलिंग कंपनी Modicare Ltd, Modi Healthcare Placement आणि Twenty Four Seven Convenience Stores विकल्या जाऊ शकतात.