पोस्टाच्या ‘या’ योजनेत मिळवा ‘दुप्पट’ फायदे, पैसे बुडण्याची नाही चिंता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय पोस्ट ऑफिसने देशभरात डाक सेवेबरोबरच विविध बचतीच्या देखील योजना आणल्या आहेत. ज्यामध्ये तुम्हाला विविध यॊजनांवर वेगवेगळे व्याजदर मिळणार आहेत. यामध्ये तुम्हाला मिळणारे व्याज हे छोट्या बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजावर आधारित असते. मागील आठवड्यात सरकारने नवीन व्याजदर लागू केले आहेत. यामध्ये तुम्ही या नवीन योजनांचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर बचत करू शकता. यामध्ये दोन नवीन योजना आल्या आहेत, ज्यामध्ये पैसे गुंतवून तुम्ही मोठ्या प्रमाणात परतावा मिळवू शकता. टाइम डिपॉजिट किंवा फिक्स डिपॉजिट अकाउंटमध्ये तुम्ही पैसे गुंतवून चांगला नफा मिळवू शकता. यामध्ये व्याजदर तीन महिन्याच्या आधारावर मिळतात. मात्र ते एका वर्षानंतर दिले जाते. त्यामुळे तुम्ही जर या योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तुम्हाला या पाच महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

१) याप्रकारे खोला खाते
फिक्स डिपॉजिट अकाउंट तुम्ही रोखीने किंवा चेकने देखील उघडू शकता. ज्यादिवसाही तुम्ही चेक जमा करणार आहेत त्या दिवशीची तारीख तुमचे खाते खोलण्याची तारीख मानण्यात येईल.

२) रक्कम
या खात्यात तुम्ही कमीतकमी २०० रुपये जमा करून खाते उघडू शकता. यामध्ये जास्तीत जास्त रकमेचे कोणतेही बंधन नाही.

३) व्याजदर आणि कार्यकाळ
या योजनेत तुम्हाला ६.९ ते ७ टक्क्यांपर्यंत व्याज मिळू शकते. त्याचबरोबर १ ते ५ वर्षांसाठी तुम्ही या योजनेत पैसे गुंतवू शकता.

करात सूट
जर तुम्ही या योजनेअंतर्गत ५ वर्षांसाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला आयकराच्या सेक्शन ८० सी नुसार सूट मिळणार आहे.

अन्य सेवा
या सुविधेत वारसदार म्हणून तुम्ही कुणाचेही नाव नोंदवू शकता. यामध्ये तुम्ही अल्पवयीन मुलगा आणि दोन वयस्कर व्यक्ती एकत्र जॉईंट खाते खोलू शकतात.

सिनेजगत बातम्या

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री