खासगीकरणानंतरही BPCL ग्राहकांना सुरू राहील एलपीजी अनुदान : पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी सांगितले की, देशातील दुसर्‍या क्रमांकाचा किरकोळ पेट्रोलियम इंधन विक्रेता भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) चे खाजगीकरण झाल्यानंतरही ग्राहकांना एलपीजी अनुदान मिळणार आहे. प्रधान म्हणाले, ‘एलपीजीवरील अनुदान थेट कोणत्याही ग्राहकांना दिले जात नाही. त्यामुळे एलपीजी विकणार्‍या कंपनीच्या मालकीवर (अनुदानावर) कोणताही परिणाम होणार नाही ”

प्रत्येक कनेक्शनवर सरकार दरवर्षी जास्तीत जास्त 12 एलपीजी सिलिंडर्स (अनुक्रमे 14.2 किग्रॅ गॅससह) अनुदान दराने प्रदान करते. हे अनुदान थेट ग्राहकांच्या बँक खात्यात दिले जाते. ग्राहक विक्रेतांकडून बाजारभावाने एलपीजी खरेदी करतात आणि नंतर अनुदान त्यांच्या खात्यावर येते. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), बीपीसीएल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) या तेल विपणन कंपन्यांच्या ग्राहकांना सरकार अनुदान देते. प्रधान म्हणाले की, एलपीजी अनुदान सर्व सत्यापित ग्राहकांना डिजिटल पद्धतीने दिले जाते. “हे थेट ग्राहकांना दिले जात असल्याने सेवा पुरवठा करणारे सार्वजनिक क्षेत्रातील आहेत की खाजगी क्षेत्रात काही फरक पडत नाही, आणि निर्गुंतवणुकीनंतरही बीपीसीएल ग्राहकांना एलपीजी अनुदान पूर्वीप्रमाणे भेटत राहील . सरकार बीपीसीएलमधील आपला संपूर्ण 53 टक्के हिस्सा व्यवस्थापन नियंत्रणासह विकत आहे.

कंपनीच्या नवीन मालकास भारताच्या शुद्धीकरण क्षमतेच्या 15.33 टक्के आणि इंधन बाजाराचा 22 टक्के हिस्सा मिळेल. देशातील एकूण 28.5 कोटी एलपीजी ग्राहकांपैकी 7.3 कोटी ग्राहक बीपीसीएलचे आहेत. “या सर्वांना शासकीय अनुदान मिळणारच आहे,” प्रधान म्हणाले. बीपीसीएल ग्राहक काही वर्षानंतर आयओसी आणि एचपीसीएलकडे जातील का असे विचारले असता ते म्हणाले की सध्या असा कोणताही प्रस्ताव नाही. ते म्हणाले, “जेव्हा आम्ही थेट ग्राहकांना अनुदान देतो, तेव्हा मालकी मध्ये येत नाही.”

You might also like