…म्हणून वॉरेन बफे पडले मागे, मुकेश अंबानी ठरले जगातील 7 वे श्रीमंत व्यक्ती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   बर्कशायर हॅथवेचे वॉरेन बफे, गूगलचे लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांना मागे ठेवून भारताचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आता जगातील सातवे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. संपूर्ण आशियातील मुकेश अंबानी हे जगातील अव्वल -10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आहेत. फोर्ब्सच्या म्हणण्यानुसार त्यांची एकूण संपत्ती 70 अब्ज डॉलर झाली आहे. गेल्या 20 दिवसांत मुकेश अंबानी यांची संपत्ती 5.4 अब्ज डॉलर्सने वाढली आहे. 20 जून रोजी फोर्ब्सच्या यादीत अंबानी नवव्या क्रमांकावर होते. रिलायन्स इंडस्ट्रीजची बाजारपेठ नुकतीच 12 लाख कोटींवर गेली असून रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये अंबानींचा वाटा 42 टक्के आहे. आज त्या शेयरमध्ये जवळपास 3 टक्के वाढ झाली आहे. हा शेयर 52 आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर आहे.

दरम्यान, फोर्ब्स रिअल टाइम अब्जाधीश क्रमवारीत, मालमत्ता शेअरच्या किंमतीच्या आधारे निश्चित केली जाते. आज रिलायन्सचा शेअर 1878.50 रुपयांवर बंद झाला तर त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 1884.40 रुपये आहे. फेसबुक, सिल्व्हर लेक, केकेआर, अबू धाबी इनवेस्टमेंट यासह अंबानीच्या जिओची एकूण 12 गुंतवणूक झाली. त्याऐवजी जिओमध्ये सुमारे 25 टक्के इक्विटी विकली गेली.

आजच्या यादीविषयी बोलायचे झाल्यास जेफ बेझोस पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण मालमत्ता 188.2 अब्ज डॉलर्स आहे, बिल गेट्स दुसर्‍या क्रमांकावर ( 110.70 अब्ज डॉलर्स), बर्नाड ऑर्नोल्ड्ट कुटुंब तिसऱ्या क्रमांकावर ( 108.8 अब्ज डॉलर), चौथ्या क्रमांकावर मार्क झुकरबर्ग ( 90 अब्ज डॉलर्स), स्टीव्ह बाल्मर पाचव्या क्रमांकावर (74.5 अब्ज डॉलर) आहे. ), लॅरी एलिसन सहाव्या क्रमांकावर ( 73.4 अब्ज डॉलर्स), मुकेश अंबानी सातव्या क्रमांकावर ( 70.10 अब्ज डॉलर्स) आहेत. यानंतर वॉरेन बफे, त्यानंतर लॅरी पेज आणि सर्गेई ब्रिन यांचा क्रमांक लागतो.

89 वर्षीय वारेन बफेयांना Oracle of Omaha म्हंटले जाते. 2006 पासून, त्यांनी बर्कशायर हॅथवे इंक च्या शेअर्समध्ये 37 अब्ज डॉलर्सहून अधिक देणगी दिली आहे.