BPCL ला विकण्याची प्रक्रिया सुरू, सरकार विकणार संपुर्ण ‘भागिदारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने भारत पेट्रोलियमचे Bharat Petroleum Corporation Limited (BPCL) खासगीकरण करण्यासाठी शनिवारी बोली लावण्यासाठी गुंतवणूकदारांना आमंत्रित केले आहे. डिपार्टमेंट ऑफ इन्व्हेस्टमेंट अॅण्ड पब्लिक असेट मॅनेजमेंट (दीपम) ने निविदा मागवण्यासंबंधित सांगितले की, बीपीसीएलनच्या विक्रीसाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (EoI) ला आमंत्रण दिले आहे. हे विकण्याची अखेरची तारीख मे 2020 आहे. त्यांनी दस्तावेजमध्ये सांगितले की, भारत सरकार बीपीसीएलमधील आपले 114.91 कोटी इक्विटी शेअर विक्रीचा प्रस्ताव ठेवत आहे, जे बीपीसीएलच्या एकूण इक्विटी शेअरच्या 52.98 टक्के आहे.

यासह खरेदीदारांसाठी कंपनीचे मॅनेजमेंट नियंत्रण सोपवले आहे. नुमालीगड रिफायनरी लिमिटेडमध्ये बीपीसीएलचे 61.65 टक्के शेअर सहभागी नाहीत. एनआरएलमध्ये कंपनीची भागीदारी एखाद्या सरकारी तेल किंवा गॅस कंपनीला विकेल.

दोन टप्प्यात निर्गुंतवणूक –
सरकाराने या निर्गुंतवणूक प्रक्रियेसाठी Deloitte Touche Tohmatsu India LLP ची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निर्गुंतवणूक प्रक्रिया दोन टप्प्यात होईल. एक्प्रेशन ऑफ इंटरेस्टच्या टप्प्यात पात्र बोली लावणाऱ्यांना आणि दुसऱ्या टप्प्यात आर्थिक बोली लावण्यासाठी आमंत्रित केले आहे.

PSU कंपन्यांनी सहभागी होण्याची परवानगी नाही –
ऑफर डॉक्युमेंटच्या मते सरकारी स्वामित्व असलेल्या कंपन्यांनी BPCL च्या खासगीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही. 10 अरब कोटी किंवा त्यापेक्षा अधिक नेटवर्थ असलेल्या कंपन्या किंवा चार कंपन्यांचा समूह या बोली लावण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतो.

बीपीसीएलचे खासगीकरण सरकारसाठी आवश्यक –
बीपीसीएलची बाजारी किंमत सध्या 87.388 कोटी रुपये आहे, सध्या यात सरकारची भागीदारी 46,000 कोटी रुपये आहे. बीपीसीएलचे खासगीकरण सरकारच्या निर्गुंतवणूकीकरणाच्या लक्ष्यासाठी आवश्यक आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी 2020 -21 च्या निर्गुंतवणूकीसाठी 2.1 लाख कोटी रुपये जमा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बीपीसीएलच्या देशात मुंबई, कोचीन, बीना,नुमालीगढ येथे रिफायनरी आहेत. या चारही रिफायनरीची एकूण क्षमता 3.83 कोटी टन प्रति वर्ष इतकी आहे.