DFS च्या ’डिजिटल आत्मसात करा’ अभियानातून 1 कोटी खातेधारकांनी अवलंबली डिजिटल पेमेंट प्रणाली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (डीएफएस) ने ट्विट करत सांगितले की, त्यांनी महिनाभरापूर्वी सुरू केलेल्या डिजिटल अपनाएं अभियान यशस्वी झाले आहे. या अंतर्गत सरकारी बँकांकडून सुमारे एक कोटी खातेधारकांना डिजिटल पेमेंट मोडसाठी तयार केले आहे.

खातेधारकांना डिजिटल आर्थिक व्यवहार करण्याची सवय लावण्यासाठी डीएफएसने 15 ऑगस्टला डिजिटल अपनाएं’ अभियानची सुरूवात केली होती. या अंतर्गत सर्व सरकारी बँकांच्या प्रत्येक ब्रँचमधून कमीत कमी 100 नव्या खातेधारकांना डिजिटल पेमेंड मोड अवलंबण्यावर जोर देण्यास सांगण्यात आले होते.

आपल्या ट्विटमध्ये डीएफएसचे सचिव देवाशीष पांडा यांनी म्हटले की, नव्या भारताच्या निर्मितीसाठी बँक मुक्त आणि सुरक्षित डिजिटल पेमेंट प्रणाली देण्यास प्रतिबद्ध आहे.

डीएफएसने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या डिजिटल अपनाएं अभियानाने जबरदस्त सुरूवात केली आहे. पब्लिक सेक्टरच्या बँकांनीसुद्धा या अभियानाच्या लाँचिंगच्या 31 दिवसाच्या आत एक कोटी बँक ग्राहकांना डिजिटल पेमेंट मोडमध्ये आणण्याचे काम केले आहे. ही भारताला डिजिटल रूपाने मजबूत करण्याची आमची प्रतिबद्धता आहे.