एका महिन्यापेक्षा जास्त काळ पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झाला नाही कोणताही बदल, जाणून घ्या कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडच्या किमती एका रेंजमध्ये मर्यादित असल्या कारणाने देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या किंमती 22 सप्टेंबरपासून तर डिझेलच्या किंमती 2 ऑक्टोबरपासून सुधारित केल्या नाहीत. सरकारी कंपनी इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे (आयओसी) चे अध्यक्ष एस.एम. वैद्य म्हणाले, ” कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 39 ते 42 डॉलर दरम्यान आहे, जी एक स्थिर रेंज म्हणता येईल. यामुळे किंमत वाढविणे किंवा कमी करण्याची गरज पडली नाही.

दिल्लीत पेट्रोलची किंमत सध्या प्रतिलिटर 81.06 रुपये तर डिझेल 70.46 रुपये प्रतिलिटर आहे. दुसर्‍या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) कंपनीच्या आर्थिक निकालाच्या घोषणेदरम्यान आयओसीचे अध्यक्ष माध्यमांशी बोलत होते. या तिमाहीत कंपनीला 6,227.31 कोटी रुपयांचा नफा झाला जो मागील वर्षीच्या तिमाहीपेक्षा 11 पट अधिक आहे. वैद्य म्हणतात की नफ्यातील ही वाढ इंवेट्रीमूळे झाली आहे.

एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीने स्वस्त दरात विकत घेतलेला क्रूड नंंतर विकल्यावर जास्त नफा झाला. इंवेट्री नफा तेव्हा होतो जेव्हा कच्चा माल स्वस्त दरात विकत घेतला जातो. परंतु जेव्हा त्यातून तयार केलेले उत्पादन बाजारात विक्रीसाठी घेतले जाते तेव्हा त्याची किंमत वाढते. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया मजबूत झाला आहे. साधारणपणे, कंपनीने या तिमाहीत प्रति बॅरल 8.62 नफा कमावला. वैद्य म्हणाले की आयओसी रिफायनरीज त्यांच्या क्षमतेच्या 94 टक्के काम करत आहेत आणि लवकरच 100 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.

मुंबईविषयी बोलताना शनिवारी पेट्रोल 87.74 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 76.86 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे. त्याचबरोबर चेन्नईमध्ये पेट्रोल 84.14 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 75.95 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. याशिवाय शनिवारी कोलकातामध्ये पेट्रोल 82.59 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 82.59 रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे.