PF अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी चेक ऐवजी देऊ शकता ‘ही’ कागदपत्र, EPFO नं दिली सुविधा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक महामारी कोरोना व्हायरसने प्रभावित ईपीएफ सदस्यांना दिलासा देण्यासाठी आपली सिस्टम सतत सुलभ करत आहे. त्याच अनुक्रमे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने (ईपीएफओ) पीएफ खातेदारांना सूचित केले आहे की, जर त्यांना पीएफ रक्कम काढायची असेल आणि त्यांच्या चेकबुकमध्ये एकही धनादेश शिल्लक नसेल तर ते ते पीएफ खात्यातील रक्कम बँकेच्या पासबुकद्वारेही काढू शकतात. मात्र, विभागाने स्पष्ट केले आहे की पासबुकचे पेज स्कॅन करून अपलोड करावे लागेल, ज्यावर खातेधारकाचे नाव, बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड स्पष्टपणे नमूद केला असेल.
हे उल्लेखनीय आहे की, पीएफ क्लेमसाठी ऑनलाईन फॉर्म भरताना आपल्याला आपल्या चेकची स्कॅन कॉपी देखील अपलोड करावी लागते. परंतु, लॉकडाऊनच्या या कठीण काळात धनादेश उपलब्ध नसल्यामुळे अनेक खातेदारांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पीएफ खातेदार ईपीएफओच्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत वारंवार प्रश्न करत होते, त्यानंतर पीएफ विभागाने खातेदारांना ही माहिती दिली आहे.
ईपीएफओने ट्विट केले आहे की, “जर तुमच्या नावाचा चेक लीफ उपलब्ध नसेल तर तुम्ही बँक पासबुकच्या त्या पानाची स्कॅन कॉपी अपलोड करू शकता, ज्यावर सदस्याचे नाव, खाते आणि आयएफएससी स्पष्टपणे दिसत असेल.”
In case of unavailability of cheque leaf with your name printed on it, you may upload scanned copy of passbook page reflecting member's name, account number and IFSC clearly.
— EPFO (@socialepfo) May 10, 2020
विशेष म्हणजे कोरोनामुळे पीडित नोकरदार लोकांच्या सोयीसाठी सरकारने पीएफ रक्कम काढण्यासंबंधित नियमात बदल केले आहेत. त्याअंतर्गत कोणताही पीएफ खातेधारक कोविड-१९ मुळे त्याच्या पीएफ खात्यातून एका मर्यादेपर्यंत नॉन-रिफंडेबल अॅडव्हान्स काढू शकतो. अडचणी आणि रोकड संकटाला सामोरे जाणारे पगारदार लोक हा पर्याय वापरत आहेत.
ईपीएफओ देखील कोविड-१९ बाबत प्राप्त होणाऱ्या क्लेमला ऑटो-मोडवर निकाली काढत आहे. विभागाने ट्वीट करुन याबाबत माहिती दिली होती.
File EPF withdrawal claim under COVID-19 category and get 75% of EPF balance or 3 months of basic wages & DA whichever is less.#IndiaFightsCorona #EPFO #CoronavirusOutbreak #SocialSecurity pic.twitter.com/UbcmEcYXOi
— EPFO (@socialepfo) April 24, 2020