Changes From 1 April : स्वयंपाकाचा गॅस स्वस्त, विमान प्रवास महाग, याशिवाय आजपासून होत आहेत ‘हे’ मोठे बदल, खिशावर होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होत आहे. आजपासून अनेक नियम बदलतील. यामध्ये विमान प्रवास भाडे, मानक वीमा पॉलिसीज सह अनेक असे नियम आहेत जे आजपासून बदलत आहेत. या महिन्यापासून 2.5 लाख रुपयांच्यावर कर्मचार्‍याच्या योगदानावर मिळवलेले व्याज कर योग्य असेल. याशिवाय पेन्शन कव्हर खरेदी करणे सोपे होणार आहे. हे कोणते बदल आहेत, ज्यांचा परिणाम तुमच्या खिशावर पडणार आहे, ते जाणून घेवूयात…

स्वस्त होत आहे स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर
एक एप्रिलपासून घरगुती गॅस सिलेंडरचे दर कमी होत आहेत. 1 एप्रिल म्हणजे गुरुवारपासून स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर 10 रुपये स्वस्त मिळेल. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने बुधवारी सायंकाळी ही माहिती दिली.

विमान प्रवास महाग
1 एप्रिल म्हणजे आजपासून देशात विमान प्रवास महाग होत आहे. नागरि विमानन महासंचालनालयाने (डीजीसीए) विमानाच्या तिकिटात एयरपोर्ट सिक्युरिटी फी (एएसएफ) वाढवली आहे. यामुळे स्थानिक आणि अंतरराष्ट्रीय दोन्ही सेवांचे भाडे वाढवण्यात आले आहे. स्थानिक विमान प्रवासाठी एएसएफमध्ये वाढ 40 रुपये आहे, तर अंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी ती 114.38 रुपये आहे. आता डोमेस्टिक पॅसेंजर्सकडून 160 रुपयांऐवजी 200 रुपये एयरपोर्ट सिक्युरिटी फी म्हणून वसूल केले जातील. तर अंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी हे 5.2 डॉलरने वाढवून 12 डॉलर केले आहे.

पीएफवर टॅक्स
नवीन आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या पीएफ योगदानावर प्राप्तीकर अंतर्गत टॅक्सची तरतूद आहे. या कक्षेत सामान्यपणे प्रति महिना दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई असलेले करदाते येतील.

सरल पेन्शन योजनेची सुरुवात
वीमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) जीवन वीमा कंपन्यांना या वर्षी 1 एप्रिलपासून सरल पेन्शन योजनेची सुरुवात करण्यास सांगितले आहे. सरल पेन्शन वीमाकर्त्याच्या नावाने केवळ दुवार्षिक पर्याय देईल.

ज्येष्ठांना आयटीआर भरण्यात दिलासा
75 वयापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ पेन्शनधारकांना इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यात सूट देण्यात आली आहे. ही सुविधा केवळ त्यांनाच मिळेल ज्यांचा उत्पन्नाचा स्त्रोत केवळ पेन्शन आणि त्यावर मिळणारे व्याज आहे.

एलटीसी इन्कॅशमेंट
रजा प्रवास सवलत (एलटीसी) व्हाऊचर अंतर्गत कर्मचार्‍यांना मिळणार्‍या सवलतीचा कालावधी 31 मार्च, 2021 पर्यंतच आहे. म्हणजे पुढील महिन्यापासून याचा लाभ घेता येणार नाही.