‘PMC बँक घोटाळा’ : मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दाखल केलं 32 हजार पानांचं ‘चार्जशीट’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी 5 आरोपींविरोधात आज मुंबईच्या मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट समोर 32 हजार पानांचं चार्जशीट दाखल केलं आहे. या चार्जशीटमध्ये एचडीआयएल कंपनीचे डायरेक्टर राकेश वधावन आणि त्यांचा मुलगा सारंग, पीएमसी बँकेचे माजी मॅनेजिंग डायेरक्टर जॉय थॉमस, बँकेचे माजी चेअरमन वरयम सिंह आणि बँकेचे माजी डायरेक्टर सुरजीत सिंह अरोरा यांना आरोपी सांगण्यात आलं आहे. या सर्वांवर आयपीसी मधील विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात चीटींग, फ्रॉड, पुरावे नष्ट करणं, कागदपत्रांसोबत छेडछाड अशा गोष्टींचा समावेश आहे.

सप्टेंबरमध्ये हे प्रकरण समोर आल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. 32000 पानांच्या चार्जशीटमध्ये पीएमसी बँकेचा फॉरेंसिक ऑडिट रिपोर्ट आणि आरोपी बँक अधिकाऱ्यांकडून खरेदी केल्या गेलेल्या संपत्तीच्या कागदपत्रांचा समावेश आहे. चार्जशीटमध्ये बँक खातेदारांसहित 340 साक्षीदारांचा जबाब आहे. पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 164 नुसार मजिस्ट्रेट समोर चार महत्त्वाच्या साक्षीदारांचा जबाब नोंदवला आहे.

पीएमसी बँक घोटाळा सप्टेंबरमध्ये समोर आला होता. जेव्हा भारतीय रिझर्व बँकेला हे लक्षात आलें की, काही लोन लपवण्याच्या हेतूनं पीएमसी बँकेनं बनावट खाती उघडली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/