PPF : पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये गुंतवणुकीपूर्वी जाणून घ्या एलिजिबिलिटी, व्याजदर आणि मॅच्युरिटीशी संबंधीत बाबी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटाच्या या काळात प्रत्येक व्यक्तीला चांगल्या उत्पन्नाच्या फंडात गुंतवणुक करायची आहे. गॅरेंटेड रिटर्नवाल्या फंडाबाबत बोलायचे तर पीपीएफ अशा स्कीममध्ये सहभागी आहे ज्यावर अनेक अन्य फंड्सच्या तुलनेत जास्त व्याज मिळते. या कारणामुळे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ) देशात सर्वात लोकप्रिय सेव्हिंग फंड्सपैकी एक आहे. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड 15 वर्षांची गुंतवणूक योजना आहे. सोबतच ही स्कीम एक्जेम्टच्या श्रेणीत येते. म्हणजेच या योजनेत गुंतवणूक, व्याजातून होणारे उत्पन्न आणि पैसे काढल्यास कर सवलतीचा लाभ मिळतो.
तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता का. तुम्हाला या योजनेत किती व्याज मिळते आणि या योजनेत किती कालावधीपर्यंत गुंतवणूक करू शकता ते जाणून घेवूयात.
पात्रता
तुम्ही तुमच्या नावावर किंवा एखाद्या अल्पवयीनाचे पालक म्हणून पीपीएफ अकाऊंट काढू शकता.
गुंतवणुकीची मर्यादा
पीपीएफ खाते उघडण्यासाठी मिनिमम अमाऊंटमध्ये काही बदल केले आहेत. ही रक्कम 500 रुपयांपेक्षा कमी असू नये आणि ती 50 रुपयांच्या मल्टीपलमध्ये असावी. एका आर्थिक वर्षात खात्यात कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येईल. पीपीएफ खाते उघडण्यासाठी अब फॉर्म ऐवजी फॉर्म 1 भरावा लागेल.
मॅच्युरिटी कालावधी
पीपीएफ अकाऊंटचा मॅच्युरिटी पिरियड 15 वर्षांचा असतो. यानंतर जर कुणी हे खाते 5 वर्षांसाठी पुढे वाढवत असेल तर त्यांना मॅच्युरिटी पिरियड संपल्यानंतर 1 वर्षाच्या आत फॉर्म 4 जमा करावा लागेल. यासाठी पूर्वी फॉर्म एच भरावा लागत होता.
व्याज दर
पूर्ण महिन्याच्या रक्कमेवर व्याज मिळवण्यासाठी माहिती दिली जाते की, प्रत्येक महिन्याच्या 5 तारीखेच्या अगोदरच पीपीएफ अकाऊंटमध्ये डिपॉझिट करावे. जर तुम्ही कुठल्या पीपीएफ इंटरेस्ट कॅलक्युलेटरचा वापर करता तर तुम्हाला याकडे लक्ष द्यावे लागेल की, व्याज दर महिना पीपीएफ खात्यात जमा सर्वात कमी रक्कमेच्या आधारावर आकारले जातेय. ही रक्कम प्रत्येक महिन्याच्या 5 तारीखेपासून महिन्याच्या अखेरीस जी रक्कम कमी असेल, त्यावर व्याज आकारले जाते. प्रत्येक तिमाहीमध्ये सरकार पीपीएफवर मिळाणार्या व्याजाला रिवाईज करते. व्याजाची रक्कम सब्सक्रायबरच्या खात्यात प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी दिली जाते.
कर्ज आणि पैसे काढणे
अशाप्रकारे मॅच्युरिटीनंतर सुद्धा विना डिपॉझिट करताही पीपीएफ खाते सुरू ठेवता येईल. असे केल्याने मॅच्युरिटीच्या वेळी जी रक्कम असेल त्यावर व्याज मिळत राहील. या व्याजाबाबत वेळोवेळी सब्सक्रायबरला माहिती दिली जाईल. तसेच सब्सक्राइबरला एका आर्थिक वर्षात एक वेळ पैसे काढण्याची संधी मिळेल.
पीपीएफ अकाऊंटच्या आधारावर लोन घेतल्यानंतर त्याची प्रिंसिपल अमाऊंट पे-इन-स्लिपद्वारे जमा केली जाऊ शकते. ती सब्सक्राइबरच्या लोन अकाऊंटमध्येच क्रेडिट केली जाईल. जेव्हा प्रिंसिपल अमाऊंट पूर्णपणे दिली जाईल, तेव्हा सब्सक्राइबर्स वार्षिक 1 टक्केच्या दराने व्याजाच्या आधारे दोन महिन्यापेक्षा कमीच्या इन्स्टॉलमेंटमध्ये व्याजाची रक्कम जमा करू शकता. हे पैसे भरणे पुढच्या महिन्या पासूनच सुरू होईल. जर लोनची रक्कम वेळेवर चुकवली नाही तर पेनल्टी म्हणून वार्षिक 6 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.