Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’च्या दरम्यान फक्त ‘या’ भारतीयाची संपत्ती वाढली, जाणून घ्या त्यांच्या व्यापाराबद्दल

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूचा प्रादुभावाने संपूर्ण जग हादरले आहे. सुमारे २०० देशांमध्ये हा विषाणू पसरला असून जगभरतीय अर्थव्यवस्था खालावली आहे. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ज्यानंतर व्यवसाय ठप्प झाले आहेत, फक्त आवश्यक सुविधा पुरवल्या जात आहेत. या सर्वांमध्ये एक भारतीय असा आहे ज्याची संपत्ती वाढत आहे. ते राधाकिशन दमानी असून उद्योग क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असलेले राधाकिशन दमानी अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्स लिमिटेडचे मालक आहेत. डी-मार्ट त्यांचेच आहे. यावर्षी दमानी यांची संपत्ती ५ टक्क्यांनी वाढली आहे. वास्तविक, लॉकडाऊनच्या घोषणेच्या वेळी लोकांनी सामान खरेदीसाठी गडबड केली होती, परिणामी त्यांचे शेअर्स १८ टक्क्यांनी वाढले आहेत.

काय आहे डी-मार्ट?

हे देशभरात पसरलेल्या सुपरमार्केटची एक शृंखला आहे. यात दैनंदिन शिवाय इतर आणखी सामान मिळते. डी-मार्ट पुढे येण्याचे कारण म्हणजे घरगुती वस्तूंवरील स्वस्त किमती आणि सवलत आहे.

ऍव्हेन्यू सुपरमार्केटचे शेअर मागच्या तीन महिन्यात २५% पेक्षा जास्त वाढले आहेत. ऍव्हेन्यू सुपरमार्केटच्या शेअरमध्ये तेजी अशा वेळेला आलली आहे जेव्हा बेंचमार्क सेन्सेक्स आणि निफ्टी २५ टक्के जास्त खाली आले आहेत.

विश्लेषकांचे म्हणणे आहे की, ऍव्हेन्यू सुपरमार्टने किराणा विक्रीसाठी कमी उत्पादन पर्याय तसेच जाहिरातींवर जवळजवळ कमी पैसे खर्च केल्यामुळे त्यांचा खर्च कमी ठेवण्यात यश आले आहे.

दुसरीकडे ऍमेझॉनचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस यांनी स्वत:ला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थापित केले आहे. त्यांची एकूण मालमत्ता ११3 अब्ज डॉलर्स आहे. जगातील अव्वल श्रीमंतांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बिल गेट्स ज्यांच्याकडे ९८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. फोर्ब्सच्या जगातील श्रीमंतांच्या ३४ व्या वार्षिक यादी जारी झाल्यावर ही माहिती समोर आली आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे या यादीत १७ व्या स्थानावर आहेत आणि भारतीय श्रीमंत लोकांमध्ये ते पहिल्या स्थानावर आहेत. मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज भारताची सर्वात मूल्यवान कंपनी आहे.