खुशखबर ! रेलयात्री अ‍ॅपला ‘IRCTC’ची मान्यता, आता ‘रेलयात्री’वर देखील तिकिट बुक करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात प्रसिद्ध ई- तिकिटींग सेवा देणारी वेबसाइट आणि अ‍ॅप ‘रेलयात्री’ला आता IRCTC ने अधिकृत तिकिट बुकिंग देणारी सेवा म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे आता रेलयात्री IRCTC बरोबर ग्राहकांना रेल्वे तिकिटची सेवा देणार आहे. IRCTC ने रेलयात्रीला लायसेंस देण्याचा निर्णय घेतला आहे.

रेलयात्रीने IRCTC कडून लायसन्स प्राप्त केले आहे. त्यामुळे आता ई-बुकिंग सेवेला कायम ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. याची घोषणा IRCTC ने केली. मागील आठवड्यात यांचे विलीनीकरण करण्यात आले आहे.

Railyatri.in चे सीईओ आणि संस्थापक मनीष राठी यांनी सांगितले की, आम्ही आमच्या युनिक माहितीच्या आधारे ग्राहकांना सेवा देणार आहोत. जेणे करुन ग्राहकांना प्रवासाचा चांगला अनुभव येईल.

काय आहे रेलयात्री –

रेलयात्री रेल्वे संबंधित सर्व काही माहिती प्रदान करते. PNR स्टेट्स, रेल्वेचे स्टेट्स, स्टेशन दरम्यानच्या रेल्वे, सीटची उपलब्धता आणि कंन्फर्मेशनच्या बाबत माहिती देते. याशिवाय ऑनलाइन बस तिकिट बुकींग तसेच रेल्वेत मिळणारे जेवण याबाबत देखील सुविधा पुरवते. नुकतेच रेलयात्रीने उत्तर आणि दक्षिणेमधील 12 शहरात इंटरसिटी स्मार्ट बस सेवेला प्रोस्ताहन दिले आहे.

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे