SBI च्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक आणि मिळवा जास्त फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पोस्टा किंवा एसबीआय आरडीच्या छोट्या गुंतवणुकीवर मोठा फायदा मिळवून देत आहेत. या खात्यामधील गुंतवणुकीवर मिळालेल्या व्याजाच्या १० हजार पर्य़ंतच्या रकमेवर कोणताही कर द्यावा लागत नाही. आरडीची मुदत पाच वर्षाची असते. तसेच भारतीय स्टेट बँकेच्या आरडी अकाऊंटवर १२ महिने कमीत कमी आणि जास्तीत जास्त म्यॅच्युरिटीचा पीरियड देण्यात आला आहे.

कसं सुरू कराल रेकरिंग डिपॉझिट

आरडी खाते पोस्टात किंवा स्टेट बँकेत उघडता येत. तसेच हे खाते उघडण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाइनही खाते उघडू शकता. पोस्टात आरडीचे खाते उघडण्यासाठी रोख रक्कम किंवा धनादेश द्यावा लागतो. तुम्हाला पोस्ट ऑफिस बदलायचे असल्यास बदलता येऊ शकते. तुमच्या पोस्टातील खात्यामधील रक्कम दुस-या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर करु शकता. तसेच दोघांच्या नावे संयुक्त खातही उघडता येते. जर तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर दहा हजार रुपयांपेक्षा जास्त व्याज मिळत असेल तर तुम्हाला कर भरावा लागेल. पोस्टात १ ते ५ वर्ष आरडी योजनेत ग्राहकाला ७.३ टक्के व्याज देण्यात येते.

एसबीआय आरडीवर असा मिळतो लाभ ?

एसबीआय बँकेच्या आरडीच्या खात्यामध्ये तुम्ही कमीत कमी शंभर रुपये गुंतवणूक करू शकता. आरडीमध्ये पैसे जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. आरडीला मुदत ठेवीप्रमाणेच व्याज दिले जाते. आरडीमध्ये असलेल्या दोन कोटींच्या कमी रकमेवर व्याजदर लागू असतो. एसबीआयच्या आरडीवर ७.५ टक्के व्याज दिले जाते.

पोस्टाच्या आरडीवर असा होणार फायदा ?

पोस्टाच्या आरडीवर गुंतवणुकदारांना ७.३ टक्के व्याज मिळते. हे व्याज चक्रवाढ पद्धती सारखे असते. दर तीन महिन्याला व्याजदरात बदल होत असतो. जर आरडीमध्ये तीन हजार रुपये गुंतवले तर पाच वर्षांनी ७.३ टक्के वर्षिक व्याजानुसार तुम्हाला २ लाख १७ हजार ५१५ रुपये मिळतील. म्हणजेच पाच वर्षात तुम्हाला ३७ हजार ५१५ रुपयांचा अधिक फायदा मिळतो.