भारतातील प्रत्येक छोटा व्यापारी बनू शकतो ‘धीरूभाई’ आणि ‘बिल गेट्स’, मुकेश अंबानींनी सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – रिलायन्स इंडस्ट्रिजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी सोमवारी म्हटले की, भारतातील प्रत्येक छोटा बिजनेसमन किंवा व्यापारी यांच्यात धीरूभाई अंबानी आणि बिल गेट्स बनण्याची क्षमता आहे. फ्यूचर डिकोडेड सीईओ संमेलनात मायक्रोसॉप्टचे सीईओ सत्या नडेला यांच्यासोबत वार्तालाप करताना त्यांनी हे विचार व्यक्त केले. ते म्हणाले, भारत जगातील तीन सर्वात मोठ्या इकॉनॉमीमध्ये सहभागी होईल. देश ’प्रीमियर डिजिटल सोसायटी’ बनण्याच्या मार्गावर आहे.

ते म्हणाले, मोबाइल नेटवर्कच्या प्रसारामुळे या दिशेने मोठे बदल होत आहेत. 2014 मध्ये पंतप्रधानांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न समोर आल्यानंतर याची सुरूवात झाली. 38 करोड लोकांनी जिओची 4जी टेक्नॉलॉजी स्वीकारली आहे. जियो येण्यापूर्वी देशात सरासरी डाटा स्पीड 256 केबीपीएस होता, जो जियो आल्यानंतर 21 एमबीपीएसपर्यंत पोहचला.

अंबानी म्हणाले, मला अजिबात संशय नाही की, आपण जगातील तीन सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या देशांमध्ये सहभगी होऊ. आता चर्चा याच गोष्टीवर होऊ शकते की हे आगामी पाच वर्षात होणार की पुढील दहा वर्षात. भारतातील लोकांकडे प्रीमियर डिजिटल सोसायटी बनण्याची संधी आहे. जियो सर्वसामान्य लोकांसाठी क्रांती बनले आहे. ते म्हणाले की, आम्ही आणि तुम्ही (नडेला) या भारतात वाढलो, येणारी पिढी वेगळा भारत पाहिल.

अंबानी म्हणाले की, भारतात गेमिंग अजून एक्झिस्टच होत नाही. हा म्यूझिक आणि मूव्हीज दोन्ही एकत्र केल्यानंतर मोठा बिजनेस होईल.

या कार्यक्रमात नडेला म्हणाले, भारतातील प्रमुख उद्योगपतींनी अशी क्षमता मिळवली पाहिजे, जी जास्त समावेशक असावी. नडेला भारताच्या तीन दिवसांच्या दौर्‍यावर आहेत. या संमेलनात मायक्रोसॉफ्टच्या प्रमुखांनी भारतातील प्रमुख आयटी आणि कन्सल्टन्सी कंपनी टीसीएसचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर राजेश गोपीनाथन यांचीही भेट घेतली.