Stock Market Close : लागोपाठ दुसर्‍या दिवशी मोठ्या वाढीसह बंद झाला शेयर बाजार, ‘हे’ स्टॉक चमकले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयटी आणि ऑटोमोबाइल कंपन्यांच्या शेयरमधील वाढीमुळे मंगळवारी सलग दुसर्‍या दिवशी स्थानिक स्टॉक एक्सचेंज वाढीसह बंद झाला. बीएसईचा 30 शेयरवर आधारित निर्देशांक सेन्सेक्स आठवड्याच्या दुसर्‍या व्यवहाराच्या सत्रात 447.05 अंकांनी म्हणजे 0.90 टक्के उसळीसह 50,296.89 अंकाच्या स्तरावर बंद झाला. अशाच प्रकारे एनएसईचा निफ्टी 157.60 अंक म्हणजे 1.07 टक्केच्या उसळीसह 14,919.10 अंकाच्या स्तरावर बंद झाला. सेक्टोरल इंडेक्सबाबत बोलायचे तर निफ्टी आयटी आणि ऑटो इंडेक्समध्ये तीन-तीन टक्केची उसळी नोंदली गेली.

निफ्टीवर टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा, विप्रो, अदानी पोर्ट्स आणि एनटीपीसीच्या शेयरमध्ये सर्वात जास्त वाढ दिसून आली. तर ओएनजीसी, एचडीएफसी, डॉक्टर रेड्डीज लॅब, कोल इंडिया आणि पॉवरग्रीड कॉर्पोरेशनचे शेयर घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्सवर महिंद्रा अँड महिंद्राच्या शेयरमध्ये सर्वात जास्त 4.98 टक्केची उसळी नोंदली गेली. एनटीपीसीच्या शेयरमध्ये 3.83 टक्के, बजाज ऑटोच्या शेयरमध्ये 3.53 टक्के आणि टेक महिंद्राच्या शेयरमध्ये 3.44 टक्केची वाढ नोंदली गेली. याशिवाय, एचसीएल टेक, नेस्ले इंडिया, भारती एयरटेल, सन फार्मा, हिंदूस्तान युनिलिव्हर लिमिटेड, आयटीसी, टायटन, एशियन पेंट, अल्ट्राटेक सीमेंट, बजाज फिनसर्व्ह, लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेयर हिरव्या निशाणीसह बंद झाले.

दुसरीकडे, ओएनजीसीच्या शेयरमध्ये सर्वात जास्त 3.16 टक्केची घसरण नोंदली गेली. तर, एचडीएफसी, पॉवरग्रीड, डॉक्टर रेड्डीज, एसबीआय आणि कोटक बँकचे शेयर लाल निशाणासह बंद झाले. याच्या मागच्या सत्रात सेन्सेक्स 49,849.84 अंकाच्या स्तरावर बंद झाला होता. मात्र, मंगळवारी बाजार वाढीसह 50,258.09 अंकाच्या स्तरावर उघडला.