शेअर बाजार पुन्हा कोसळला ! Sensex 300 अंकांनी घसरला, Maruti, L&T च्या शेअर्समध्ये मोठी घट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  जागतिक पातळीवरील प्रमुख निर्देशांकांच्या आकडेवारीमुळे या आठवड्यात देशांतर्गत शेअर बाजारातही मोठी घट दिसून येत आहे. बीएसईचा ३० शेअरवर आधारित संवेदी निर्देशांक सेन्सेक्स मंगळवारी ३००.०६ अंक म्हणजेच ०.७९ टक्क्यांनी घसरून ३७,७३४.०८ वर बंद झाला. मागील सत्रात सेन्सेक्स ३८,०३४.१४ अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. सुरुवातीच्या व्यापारात सेन्सेक्स ३८,२००.७१ अंकांच्या पातळीवर उघडला. मात्र नंतर त्यात घट झाली आणि दिवसाच्या व्यापारात ते ३७,५३१.१४ अंकांच्या पातळीवर होते. मात्र नंतर ते किरकोळ सुधारले आणि शेवटी ३७,७३४.०८ पातळीवर बंद झाले. त्याचप्रमाणे एनएसई निफ्टी ९६.९० अंकांनी म्हणजेच ०.८६ टक्क्यांनी घसरून ११,१५३.५५ अंकांच्या पातळीवर बंद झाला.

या शेअरमध्ये घट

बीएसईवर मारुतीच्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.८३ टक्के, लार्सन अँड टुब्रोच्या शेअर्समध्ये २.८२ टक्के, इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये २.७९ टक्के आणि अ‍ॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये २.५९ टक्के घट दिसून आली. याशिवाय ओएनजीसी, एचडीएफसी, रिलायन्स, एशियन पेंट, कोटक महिंद्रा बँक, टायटन, नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, आयटीसी, पॉवरग्रीड, बजाज फायनान्स, एनटीपीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस आणि बजाज ऑटो यांचे शेअर्सही लाल खुणांसह बंद झाले.

या शेअर्सची झाली चांदी

तर दुसरीकडे एचसीएल टेकचे शेअर्स २.४३ टक्क्यांनी वधारले. टीएसएसच्या शेअर्समध्ये २.३९ टक्के वाढ झाली. टेक महिंद्राचे शेअर २.२० टक्क्यांनी वाढले. याशिवाय सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, अल्ट्राटेक सिमेंट, भारती एअरटेल, एसबीआय आणि टाटा स्टील यांचे शेअर्सही हिरव्या चिन्हासह बंद झाले.

आनंद राठी मधील प्रमुख

इक्विटी रिसर्च (फंडामेंटल) नरेंद्र सोलंकी म्हणाले की, कोविड-१९ मुळे बर्‍याच ठिकाणी नव्याने निर्बंध आल्यामुळे अन्य प्रमुख बाजारात विक्री झाल्यामुळे भारतीय बाजार घसरत आहे.

ते म्हणाले की, दुपारच्या सत्रात बाजारात थोडी रिकव्हरी सुरु झाली होती, पण अन्य बाजारात पुन्हा विक्री झाल्यामुळे देशांतर्गत बाजारातील रिकव्हरी कायम राहू शकली नाही.

शांघाय, हाँगकाँग आणि सिओलमधील शेअर बाजार मोठ्या प्रमाणात बंद झाले. दुसरीकडे युरोपियन बाजारात सुरुवातीच्या व्यापारात तेजी दिसून येत आहे.