शेअर बाजारचा नवा रेकॉर्ड; सेन्सेक्स पहिल्यांदाच 52,000 पार

नवी दिल्ली : आठवड्याच्या सुरूवातीलाच आज शेअर बाजार मोठ्या प्रमाणात उसळलेला दिसला. सकाळी 9.17 च्या सुमारास बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा प्रमुख सूचकांक सेंसेक्स 44,143 अंकांनी वधारून 51,985.73 च्या स्तरावर गेला. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 121.80 अंकांच्या उसळीसह 15,285.10 स्तरावर गेला.

शेअर बाजार आज पहिल्यांदाच 52000 च्या वर गेला आहे. शेअर बाजारात सेन्सेक्सच्या टॉप टेनमध्ये सात कंपन्यांचा बाजार मिळून 1,40,430.45 कोटी रुपये गेला आहे. तसेच यामध्ये सर्वाधिक फायदा हा रिलायन्स इंडस्ट्रीजला झाला. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजार कमी प्रमाणात वाढून बंद झाला. तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 10.00 अंक तुटून 15,163.30 च्या स्तरावर गेला आहे. पण आज सकाळी 9.23 च्या सुमारास सेंसेक्स 470.06 अंकांनी वधारून 52,014.36 वर स्थिरावला.

https://twitter.com/ANI/status/1361164036608462857

दरम्यान, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर बाजार सातत्याने वाढत आहे. गेल्या दिवसातील काही अपवाद वगळता शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात उत्साह निर्माण झाला आहे. तसेच परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूदारांना (FPI) फेब्रुवारी महिन्यात भारतीय बाजारात 22,038 कोटी रुपयांची शुद्ध गुंतवणूक झाली आहे.

बँकिंग शेअरमध्ये तेजी

आजच्या बँकिंग शेअरमध्ये तेजी दिसली. आज सर्वात जास्त इंडसइंड बँकेत 3 टक्के वाढ झाल्याचे दिसले. याशिवाय कोटक बँक, ICICI बँक, HDFC बँक, एक्सिस बँक या बँकांची स्थितीही चांगली आहे.