शेअर बाजारामधील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं 11 लाख कोटी रूपयांचं झालं नुकसान, जाणून घ्या मोठं कारण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   शेयर बाजारात घसरणीमुळे सहा दिवसात गुंतवणुकदारांचे 11,31,815.5 लाख कोटी रूपये स्वाह झाले आहेत. सहाव्या सत्रात गुरुवारी बीएसई सेंसेक्स 1,114.82 अंक किंवा 2.96 टक्क्यांनी घसरून 36,553.60 अंकांवर बंद झाला. बीएसई-लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 1,48,76,217.22 कोटी रुपये होते, जे सहा सत्रात घसरून 11,31,815.5 कोटी रुपयांवर आले. 16 सप्टेंबरपासून 30 शेयरचा बीएसई बेंचमार्क इंडेक्स 2,749.25 अंकांनी कोसळला. गुरुवारच्या व्यवहारात हिंदुस्तान युनिलिव्हर वगळता सेंसेक्सचे सर्व शेयर लाल निशाणीत बंद झाले.

सर्वात जास्त घसरण इंडसइंड बँकेत होती, तिचे शेयर 7.10 टक्केपर्यंत घसरले, यानंतर बजाज फायनान्स, एमअँडएम, टेक महिंद्रा, टीसीएस आणि टाटा स्टीलचे शेयर होते. बीएसईच्या स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकात 2.28 टक्केपर्यंतची घसरण नोंदली गेली.

बीएसईमध्ये एकुण 2,025 कंपन्यांमध्ये घसरण आली, तर 625 अ‍ॅडव्हान्स आणि 162 मध्ये कोणताही बदल झाला नाही. बीएसई आयटी इंडेक्समध्ये 4.45 टक्केच्या घसरणीसह सर्व सेक्टोरल इंडेक्समध्ये घसरण होती आणि यानंतर टेक, ऑटो, मेटल, रियल्टी, बेसिक मटेरियल, बँक्स आणि फायनान्समध्ये घसरण झाली.

गुरुवारी बीएसईचा 30 शेयर्सवर आधारित संवेदी निर्देशांक सेंसेक्स 1,114.82 अंक म्हणजे 2.96% घसरून 36553.60 अंकाच्या स्तरावर बंद झाला. अशाच प्रकारे एनएसईचा निफ्टी 326.30 अंक म्हणजे 2.93 टक्के घसरून 10805.55 अंकाच्या स्तरावर बंद झाला.

व्यवसायिकांच्या नुसार, इकॉनॉमिक रिकव्हरीबाबत वाढत्या चिंता आणि केंद्रीय बँकांकडून नव्या प्रकारे प्रात्साहन पॅकेज न दिले गेल्याने जागतिक बाजारात विक्री दिसून येत आहे. त्यांनी सांगितले की, जगातील अनेक अर्थव्यवस्थांमध्ये कोविड-19 च्या नव्या प्रकरणांच्या वाढीच्या शंकेने सुद्धा गुंतवणुकदारांच्या सेंटिमेंटवर परिणाम होत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like