कामाची गोष्ट ! WhatsApp द्वारे झटपट मिळेल Loan, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टाटा समूहाची आर्थिक सेवा देणारी कंपनी टाटा कॅपिटलने व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून त्वरित कर्ज देण्याची सुविधा सुरू केली आहे. कंपनीने या सुविधेचे नाव ‘स्विफ्ट इंस्टा पर्सनल लोन’ (एसआयपीएल) ठेवले आहे. टाटा कॅपिटलचे विद्यमान ग्राहक सहजपणे कंपनीच्या व्हॉट्सऍप चॅटबॉट टीआयएमार्फत कर्जासाठी अर्ज करु शकतात आणि कर्जाची मंजुरी मिळवू शकतात. कंपनीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. कंपनीने अलीकडेच व्हाट्सऍप चॅटबॉट टीआयए सुरू केले होते. या चॅटबॉटद्वारे ग्राहकांना विविध प्रकारच्या सूचना प्राप्त होतात.

टाटा कॅपिटलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हे चॅटबॉट ग्राहकांना त्यांच्या ईएमआयशी संबंधित माहिती पुरवण्यापासून ग्राहकांच्या नोंदी अद्ययावत करण्यापर्यंत सक्षम आहे. कंपनीने म्हटले आहे की, हे एक अतिशय सोयीचे माध्यम आहे आणि म्हणूनच एसआयपीएल व्हाट्सऍपवर लाँच केले गेले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, यामुळे ग्राहकांना एकाच प्लॅटफॉर्मवर कर्जासाठी अर्ज करण्यास आणि मान्यता मिळवण्यास परवानगी देते.

कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
एसआयपीएल अर्ज करण्यासाठी विद्यमान ग्राहकांना त्यांच्या फोनमध्ये ७५०६७५६०६० क्रमांक सेव्ह करावा लागेल. यानंतर तुम्हाला ‘हाय’ लिहून मेसेज करावा लागेल.
मेनू वरून ‘स्विफ्ट इंस्टा पर्सनल लोन’ निवडा.
यानंतर ‘वन टाइम पासवर्ड’द्वारे पडताळणी करावी लागेल.
कर्जाची रक्कम निवडा आणि मंजुरीसाठी प्रतीक्षा करा.
कर्ज मंजुरीच्या तरतुदीबद्दल तुम्हाला त्वरित माहिती मिळेल.

या चरणांचे अनुसरण केल्यानंतर ग्राहकांना ईमेल आयडीवर एसआयपीएलच्या मंजूर रकमेबद्दल माहिती दिली जाईल.

व्हॉट्सअ‍ॅपवर या त्वरित कर्जाची सुविधा सुरू करण्याबाबत टाटा कॅपिटलचे चीफ मार्केटिंग अँड डिजिटल ऑफिसर ए बॅनर्जी म्हणाले की, “आमचा हा उपक्रम त्या डिजिटल ग्राहकांसाठी आहे, ज्यांना एका प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा जास्त समाधान हवे आहे. सर्व्हिस रिक्वेस्टमध्ये वाढ आणि ग्राहकांच्या अभिप्रायाच्या आधारावर आम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध असलेल्या आमच्या सेवांचा विस्तार केला आहे. एसआयपीएल त्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे आणि आम्ही भविष्यातही या प्लॅटफॉर्मचा आणखी विस्तार करू.”