GDP वर 2 वर्षांपर्यंत दिसू शकतो ‘महामारी’चा परिणाम, भारताकडे संकटाला संधीमध्ये बदलण्याचा ‘पर्याय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे अंशकालीन सदस्य निलेश शहा यांनी बुधवारी सांगितले की, भारताच्या आर्थिक विकासाची गती पुढील वर्षाच्या मार्च किंवा जूनच्या तिमाहीत नकारात्मकमधून सकारात्मक अंकापर्यंत येऊ शकते. तथापि, भारताने संकटाच्या या काळाला सुधारणांच्या माध्यमातून संधींमध्ये रुपांतर केले पाहिजे. कोटक महिंद्रा अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक शाह म्हणाले की, गुंतवणूकदारांना भविष्याबद्दल आशा आहे आणि ते भूतकाळाचा डेटा पाहत नाहीत. कोविड -19 लॉकडाऊनमुळे जूनच्या तिमाहीत भारताच्या जीडीपीमध्ये 23.9 टक्के घट झालेली पहायला मिळाली आहे.

शाह यांनी व्यावसायिक नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंकेडिनने आयोजित कार्यक्रमात सांगितले की, “सध्याच्या परिस्थितीत असे दिसून येते की, मार्च 2021 या तिमाहीत जीडीपीची वाढ किंवा जून 2021 तिमाहीत वार्षिक आधारावर सकारात्मक संख्या होऊ शकते.”

त्यांनी या गोष्टीकडे इशारा केला की, दोन वर्षांपासून सकल घरगुती उत्पादनावर (जीडीपी) साथीचा परिणाम दिसून येऊ शकतो. तथापि, 1991 च्या चलनवाढीच्या संकटाप्रमाणेच यावेळीही त्यांनी आव्हानात्मक परिस्थितीचा फायदा घेण्याची गरज व्यक्त केली. 1991 मध्ये विविध सुधारणानंतर देशात तेजीने वाढ झालेली पहायला मिळाली होती.

शहा म्हणाले की, कंपन्यांना चीनमधून बाहेर पडायचे आहे आणि भारताने त्यांचे जोरदार स्वागत केले पाहिजे. ते म्हणाले की, लॉजिस्टिकशी संबंधित खर्च जागतिक पातळीवर भारतीय वस्तूंना स्पर्धात्मक बनवतात. याशिवाय विजेची किंमतही कमी केली जावी कारण शेतकऱ्यांना अनुदानित वीज दिल्यास या उद्योगांना महागडी वीज मिळते.

शेअर बाजाराच्या तेजीविषयी ते म्हणाले की, लॉकडाऊन ही भूतकाळातील गोष्ट आहे, तर भविष्य हे सुधारणांशी जोडलेले आहे, ज्यामुळे भारताच्या वाढीची दिशा बदलली जाईल आणि बाजार त्याच गोष्टी या रुपाने घेत आहेत. ते म्हणाले की, मोठ्या प्रमाणात भांडवली प्रवाह, स्वस्त तेलाचे दर, चांगला मान्सून अशी काही बाबी आहेत जी आपल्याला भविष्याबद्दल आशावादी बनवू शकतात. बाजार आशेने भविष्याकडे पहात आहे.