सरकारच्या ‘या’ बॉन्ड स्कीममध्ये मिळतायेत सर्वाधिक रिटर्न, जाणून घ्या कसा घेऊ शकता फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने बर्‍याच लहान बचत योजनांवरील व्याजदरात कपात केली आहे. या कपातीनंतर एप्रिल तिमाहीच्या तुलनेत अत्यंत लोकप्रिय बचत योजना पीपीएफवरील व्याजदर कमी होऊन ७.१ टक्क्यांवर आले आहे. तसेच Senior Citizen Saving Schemes (एससीएसएस) वरील व्याज दर ८.६ टक्क्यांवरून ७.४ टक्क्यांवर आले आहे. तर टपाल कार्यालये आणि बँका एफडीवर ५.५ टक्के ते ७.२५ टक्के व्याज देत आहेत. अशा परिस्थितीत भारत सरकारची ७.७५ टक्के व्याज देणारी टॅक्सलॅब बॉन्ड योजना चांगली आहे. या बाँडला आरबीआय ७.७५% बॉन्ड असेही म्हणतात.

या बॉन्डची खास वैशिष्ट्ये
1) गुंतवणूक आणि टॅक्स एक्स्पर्ट बलवंत जैन यांच्या मते, सध्याच्या काळात पीपीएफ, एससीएसएस, एफडी आणि इतर बचत योजनांवर जास्त व्याज मिळत नाहीये. अशात भारत सरकारकडून जारी केलेला हा बॉन्ड गुंतवणूकीच्या दृष्टीने चांगला पर्याय आहे. तसेच तो पूर्णपणे सुरक्षित आहे. कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो, असे त्यांनी सांगितले.

2) जैन म्हणाले की, या बॉन्डवरील व्याज दर वर्षाकाठी मोजला जातो, परंतु दर सहा महिन्यांनी आपल्या बचत खात्यात व्याज येते. या व्यतिरिक्त क्यूमलेटिव्ह इंटरेस्टचा पर्यायदेखील आहे. या अंतर्गत बॉन्डच्या मॅच्युरिटी वेळी व्याज दिले जाते. या योजनेत गुंतवणूकीची कोणतीही कमाल मर्यादा नाही. यामुळे ज्यांना गॅरंटीड रिटर्न हवा आहे, ते यात गुंतवणूक करु शकतात.

3) हा बॉन्ड तुम्हाला सात वर्षांच्या कालावधीसाठी घ्यावा लागतो. मात्र, ६०-७० वर्षे वयोगटातील लोक ६ वर्षानंतर प्रिमॅच्युअर रक्कम काढू शकतात. त्याचप्रमाणे ७०-८० वर्षे वयोगटातील लोक पाच वर्षांनंतर आणि ८० वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक चार वर्षानंतर रक्कम काढू शकतात.

4) जैन म्हणाले की, आज कोणत्याही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत किंवा मोठ्या खासगी बँकेत या बाँडसाठी अर्ज करू शकता. मात्र, या योजनेतील गुंतवणूकीतून मिळणारे व्याज पूर्णपणे करपात्र आहे आणि व्याज भरण्यावर टीडीएस देखील वजा केले जातो.