IPO मार्केटमध्ये ही सरकारी कंपनी करणार एन्ट्री, जाणून घ्या ‘या’ पब्लिक ऑफरचा आकार, शेअरची किंमत आणि इतर महिती

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारी मालकीची संरक्षण क्षेत्रातील कंपनी माझगाव डॉक शिपबिल्डर्स (Mazagon Dock Shipbuilders) चे इनिशियल पब्लिक ऑफर (आयपीओ) 29 सप्टेंबर 2020 म्हणजे मंगळवारी सबस्क्रिप्शनसाठी खुले होतील. कंपनीने या आयपीओसाठी 135-145 रुपये प्रति शेयरची प्राईस बँड ठरवली आहे. कंपनीने गुरुवारी व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्सद्वारे ही माहिती दिली. माझगाव डॉक शिपबिल्डर्सचे आयपीओ एक ऑक्टोबरपर्यंत सबस्क्राईब करता येतील.

कंपनी ऑफर फॉर सेलद्वारे 3,05,99,017 शेयर्ससाठी हे इनिशियल पब्लिक ऑफर घेऊन आली आहे. प्राइस बँडचा विचार करता कंपनी या आयपीओद्वारे 444 कोटी रूपये जमवणार आहे. तर, खालच्या प्राइस बँडद्वारे कंपनी 413 कोटी जमवणार आहे.

कंपनीचे शेयर बीएसई आणि एनएसईवर लिस्ट केले जातील.
यस सिक्युरिटीज, अ‍ॅक्सिस कॅपिटल, एडलविस फायनान्शियल, आयडीएफसी सिक्युरिटीज आणि जेएम फायनान्शियल या ऑफरचे मॅनेजर आहेत.

कंपनीच्या आयपीओ कागदपत्रांनुसार, माझगाव डॉक शिपबिल्डर्स भारतीय नौदलाद्वारे वापरण्यात येणार्‍या युद्धनौका आणि पाणबुड्यांची निर्मिती आणि दुरूस्तीचे काम करते. कंपनी इतर व्यवसायिक क्लाएंट्ससाठी सुद्धा जहाज निर्मिती करते.