कामाची गोष्ट ! ‘जन धन’ खात्यातून पैसे काढण्यासाठी SBI नं आणलाय ‘प्लॅन’, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –   महिलांच्या जनधन खात्यात शुक्रवारी 500 रुपयांचा पहिला हप्ता टाकला जाणार आहे. लॉकडाऊनच्या या कठीण परिस्थितीत गरिबांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजमध्ये जाहीर केल्यानुसार महिलांच्या जनधन खात्यात हा पहिला हप्ता टाकण्यात येणार आहे. सरकारने जाहीर केले की, तीन महिने महिलांच्या जन धन खात्यात महिन्याला 500 रुपये टाकले जातील. विशेष म्हणजे कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने 25 मार्चपासून देशभरात 21 दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियाने या जन-धन खात्यांमधून पैसे काढण्याचे वेळापत्रक तयार केले आहे. लॉकडाऊनमुळे होणारी रोखीची कमतरता कमी करण्याच्या प्रयत्नात, बँकांनी खाती काढून घेण्यासाठी आणि सामाजिक अंतर राखण्यासाठी बँकांच्या बाहेरील गर्दी टाळण्यासाठी हे वेळापत्रक तयार केले आहे.

एसबीआयची ही पैसे काढण्याची योजना लाभार्थ्यांच्या बँक खात्याच्या शेवटच्या क्रमांकावर आधारित आहे. या पैसे काढण्याच्या योजनेनुसार ज्यांच्या जन-धन खात्यात अंतिम अंक 0 किंवा 1 आहे तो 3 एप्रिल 2020 रोजी बँकेत जाऊन पैसे काढू शकेल. त्याचप्रमाणे ज्यांचा खाते क्रमांकाचा शेवटचा अंक 2 किंवा 3 आहे. ते 4 एप्रिल 2020 रोजी रक्कम काढू शकतात.

एसबीआयने एका निवेदनात अशी माहिती दिली आहे की, ज्या लाभार्थ्यांचा खाते क्रमांकचा अंतिम अंक 4 किंवा 5 आहे ते 7 एप्रिल 2020 रोजी, ज्यांचे 6 किंवा 7 आहे ते 8 एप्रिल 2020 रोजी, ज्यांचा 8 किंवा 9 आहेत ते 9 एप्रिल 2020 रोजी रक्कम काढून घेऊ शकतात. त्याचबरोबर 9 एप्रिलनंतर लाभार्थी त्यांच्या सोयीनुसार कोणत्याही कामाच्या दिवशी बँकेतून पैसे काढू शकतात.

एसबीआयने अशी विनंती केली आहे की, लाभार्थ्यांनी बॅंकेत गर्दी न करता जवळच्या एटीएममध्ये जाऊन शक्य असल्यास फक्त 2000 रुपये काढावेत. कोणत्याही बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्याने कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.